पुणे

विमानतळ भूसंपादनाच्या हरकतींची सुनावणी पूर्ण, आता पॅकेजची प्रतीक्षा पुरंदरच्या शेतकऱ्यांची मागणी मोजणी नंतरच मोबदल्यात पण पॅकेज संदर्भात स्पष्टता नाही


विमानतळ भूसंपादनाच्या हरकतीची सुनावणी पूर्ण ;आता पॅकेजची प्रतीक्षा पुरंदरच्या शेतकऱ्यांची मागणी मोजणी नंतरच मोबदल्यात पण पॅकेज संदर्भात नाही स्पष्टता

सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक:: पुरंदर विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाबाबत सात गावांमधील शेतकऱ्याकडून जिल्हा प्रशासनाच्या वतीने हरकती सूचना मागविण्यात आल्या होत्या. या हरकतीवरील सुनावणी पूर्ण झाली असून, काही शेतकऱ्यांनी विमानतळाला आपला विरोध कायम ठेवला असला,

तरी काही शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या मोबदल्याचे पॅकेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यानंतर संपादनासाठी जमीन देण्याबाबत शेतकरी निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रस्तावित पुरंदर विमानतळासाठी तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, कुंभारवळण, एखतपुर, मुंजवडी, खानावडी आणि पारगाव या सात गावांमधून सुमारे 2673 हेक्टर जमीनचे भूसंपादन करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना भूसंपादनासाठी 32 (2) च्या नोटीस देण्यात आल्या,

या नोटिसा नंतर शेतकऱ्यांना हरकती सूचना देण्यात सांगण्यात आले होते. त्यानुसार या सर्व गावांमधील शेतकऱ्याकडून 2052 हरकती नोंदवण्यात आल्या होत्या. त्यावर भूसंपादनासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्याकडून, या सुनावणी घेण्यात आल्या. या सुनावणीला नऊ जून पासून सुरुवात झाली होती. सुमारे महिनाभर चाललेल्या सुनावणी दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी या विमानतळाला पाठिंबा दर्शवला.

मोबदल्याबाबत हे प्रश्न अनुत्तरीतच मोबदला किती आणि कसा दिला जाईल, पुनर्वसनाची योजना असेल का? मोजणी कधी होईल असे प्रश्न, शेतकऱ्याकडून उपस्थित केले जात आहेत. आता भूसंपादनासाठी त्या जागेचे सर्वेक्षण आणि मोजणी करण्याची आवश्यकता आहे या सुनावणीनंतर प्रशासन मोजणीला सुरुवात करेल का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यासाठी मोबदला अजून ठरलेला नसल्याने,

सरकारने भूसंपादनाच्या मोबदल्यात पैसे सोबत जमीन द्यावी, तसेच पॅकेजची घोषणा लवकर करावी, अशी मागणी केली आहे. त्यानंतर शेतकरी भूसंपादन करण्यास तयार होतील. अशीही सूत्रांनी स्पष्ट केले, तर काही शेतकऱ्यांनी भूसंपादनाला विरोध कायम ठेवला आहे. कुठल्याही परिस्थितीत जमीन सरकारला देणार नसल्याचे सांगितले. सुनावणी नंतर जिल्हा प्रशासन आणि सरकार काय भूमिका घेणार याकडे शेतकऱ्यांची लक्ष लागले आहे.

भूसंपादन तसेच जमिनीचा मोबदला ठरविण्यासाठी त्या जमिनीची मोजणी आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने तीन मे रोजी जमिनीचे ड्रोन सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र गावकऱ्यांनी आंदोलन करीत हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर सर्वेक्षण थांबवण्यात आले होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बैठक घेऊन, सर्वसामान्य तोडगयासाठी शेतकऱ्यांनी पॅकेज सुचवावे किंवा राज्य सरकार स्वतंत्र पॅकेज देईल, असे स्पष्ट केले होते. एकुणात भूसंपादनासाठी शेतकऱ्यांचा अधिकार्‍यांशी विरोध मावळलेला दिसतो.


Translate »
error: Content is protected !!