पुरंदर तालुक्यातील पारगाव ते रिसे पिसे पर्यंत चिखलाचे साम्राज्य
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::
पुरंदर तालुक्यातील पारगाव ते रिसेपिसे पर्यंत चिखलाचे साम्राज्य; रस्त्याच्या या दूरदृष्टीमुळे सासवड सुपा एस.टी सासवड आगारातून बंद
सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक सासवड- पारगाव- पिसर्वे -नायगाव- रिसेपिसे मार्गे सुपा जाणाऱ्या रस्त्याचे काम मागील काही दिवसापासून सुरू असताना, हा रस्ता सिमेंटचा होणार असल्यामुळे स्थानिकांमध्ये समाधान होतेच, तर ते समाधान फार काळ टिकू शकले नाही, अर्धवट आणि निष्काळजीपणे काम केलेल्या रस्त्याची दुरावस्था अत्यंत धोकादायक झाली असल्याने,
या मार्गावरून धावणाऱ्या एस.टी बस फेऱ्या अखेर बंद करण्यात आलेल्या आहेत. सासवड एसटी कामगार संघटनेचे आगार व्यवस्थापकांना हे पत्र दिले असून, रस्त्याच्या अशा दयनीय अवस्थेमुळे, प्रवास वाहतूक करणे शक्य नसल्याचेही, त्यांनी स्पष्ट केले आहे. मागील दोन दिवसांमध्ये तर झालेल्या पावसामुळे चिखल व गाळ साचला आहे. काही ठिकाणी एस.टी बसेस या चिखलात
अडकून पडलेली आहेत, त्या बाहेर काढण्यासाठी जेसीबीची मदत घ्यावी लागली आहे. मुख्यत्वे नायगाव येथे म्हसोबा मंदिराजवळील तयार करण्यात आलेला पर्याय रस्ता हा वाहून गेला आहे, वायकर वाडी येथे केवळ माती भरल्यामुळे गाड्या घसरत आहेत,राजुरी ते रिसेपिसे पयॅत पणे अशीच चिखलामुळे परिस्थिती झालेली आहे
पिसे येथील कॅम्पसमधील अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात अशा तक्रारी आतापयॅत सामान्य नागरीकानी केल्या आहेत. याला सवॅसवी जबाबदार ठेकेदार आहे अदाधुदी कारभार या ठेकेदाराचा असल्याने सामान्य जनतेला नाहक त्रास होत आहे. या रस्त्याचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू असून, सुमारे 87 किलोमीटर लांबीच्या सिमेंट रस्त्याचे काम ठेकेदाराच्या
हलगर्जी पणा मुळे काम बंद पडलेले आहे. पावसाळा सुरू होऊन, देखील मुरूम न टाकता माती मिश्रित रस्ते, आज संपूर्ण प्रवासासाठी धोकादायक बनलेले आहेत. याला ठेकेदाराचा हलगर्जीपणा हा कारणीभूत आहे. प्रवास करताना, या ठिकाणी तर खूप अडचणी येत आहेत. पारगाव ते रिसेपिसे पर्यंत साधारण 20 ते २२ किलोमीटर अंतराचा रस्ता हा अतिशय खराब झाला आहे. थोडा पाऊस झाला तरी हा रास्ता घसरत आहे, पर्यायी मार्ग निकामी ठरत
असल्याकारणाने, त्यामुळे वाहन चालक व प्रवाशांना जीव आपला धोक्यात घालून, या ठिकाणी प्रवास करणे अशक्य झाले आहे. प्रवीण माळशिकरे वाहतूक संघटना प्रमुख सासवड. निकृष्ट कामाबाबत स्थानिक नेते पुरंदर मधील काही बोलत नाहीत, अशी चर्चा सामान्य नागरिकांमध्ये चालू आहे, कामगार, विद्यार्थी, प्रवासी असे खाजगी वाहनांमध्ये जीव मुठीत घालून, आपला प्रवास करण्यासाठी मजबूर झालेले आहेत, तर काही दिवसांमध्ये शाळा सुरू होणार असल्या
कारणाने, या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे, विद्यार्थ्यांची तर गैरसोय होणार आहे. संतोष राजाराम मुळीक, सामाजिक कार्यकर्ते पिसे. जेव्हा सर्वे अहवाल अनुकूल येईल, तेव्हाच या मार्गावर एस.टी सेवा पुन्हा सुरू करण्यात येईल, तोपर्यंत कुठलाही निर्णय घेतला जाणार नाही, अवकाळी पाऊस झाल्यामुळे याठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरल्या कारणाने, या मार्गावरील वाहतुकीमध्ये एस.टीचे खूप मोठ्या
प्रमाणावर नुकसान झालेले आहे. एस.टी रूतून बसले तर जीसीपी ने सुद्धा लवकर त्या ठिकाणी एसटी निघत नाही, त्या कारणाने सासवड सुपा रोडवरील एस.टी वाहतूक सध्या तरी बंद करण्यात आली आहे. असे एसटी प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सागर गाडे, आगारप्रमुख सासवड एसटी स्थानक प्रमुख पुरंदर.






