क्राईम न्यूज

सासवड येथे अज्ञात इसमाकडून 38 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
सासवड येथे अज्ञात इसमाकडून युवकाची निर्घृण हत्या

दि. 08 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी अंदाजे 6.00 वाजेपासून ते दि. 09 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10.30 वाजेपर्यंतच्या दरम्यान मौजे सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे येथील आनंद वाईन्सच्या पाठीमागील बाजूस असलेल्या दत्ता घाटे यांच्या बांधकामाधीन इमारतीमध्ये अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून एका तरुणाची निर्घृण हत्या केली.

फिर्यादी गजानन दत्तात्रय बोराडे (वय 33, रा. हिवरकर मळा, सासवड) यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा भाऊ राजू दत्तात्रय बोराडे (वय 38, रा. म्हाडा कॉलनी, सासवड) याच्यावर कोणत्यातरी धारदार शस्त्राने चेहरा, मान व पोटावर वार करून ठार मारण्यात आले.

या फिर्यादीवरून सासवड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 471/2025 भा.दं.सं. कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी भोर उपविभाग माननीय राजेंद्रसिंह गौर तसेच पोलीस निरीक्षक, सासवड पोलीस स्टेशन यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन विशेष पोलिस पथके नेमण्यात आली असून गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे हे करीत आहेत.


Translate »
error: Content is protected !!