पुणे

वारीच्या वाटेवर सोपानदेव मंडळाचा उपक्रम….


सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::

वारीच्या वाटेवर सोपानदेव मंडळाचा उपक्रम…
सासवड (प्रतिनिधी) संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचे धाकटे बंधु संत सोपानदेव यांच्या आषाढ वारीच्या पालखी सोहळ्यात

प्रस्थान समयी सासवड शहरातील अनेक प्रतिष्ठाने, सामाजिक संस्था,गणेश मंडळे, पतसंस्था, बँका वारकऱ्यांची विविध स्वरूपात सेवा करत असतात. संत सोपानदेव मंदिरानजीकच्या संत सोपानदेव सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ देखील ह्या वारी सेवेची परंपरा अखंड जपत आहे. वारकऱ्यांचा वारीतील प्रवास सुखकर व्हावा या साठी मंडळ दरवर्षी वेगवेगळ्या वस्तूंचे वाटप करून एक सामाजिक उत्तरदायित्व जपण्याचा प्रयत्न करत आहे

यावर्षी मंडळांचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते वामनतात्या जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पालखी प्रस्थान सोहळा समयी पालखीवर फुलांची वृष्टी करण्यात आली व वारीतील वारकऱ्यांना प्रवासात उपयुक्त ठरतील अशा कापडी पिशव्यांचे वाटप केले. प्रत्येक दिंडीतील अनेक वारकऱ्यांनी याचा लाभ घेतला.

मंडळाचे अध्यक्ष रोहन जगदाळे यांसह शुभम जगताप, समीर जगताप, राजेंद्र सोळसकर, सुरेंद्र इंगळे, अमोल गवळी, आकाश संकपाळ, चिन्मय चव्हाण, दिनेश काकडे यांसह
अनेक कार्यकर्ते मंडळींनी या प्रसंगी सहभाग नोंदवला.


Translate »
error: Content is protected !!