पुणे

काळेवाडी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार ;


मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
काळेवाडी येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला ठार

पुरंदर तालुक्यातील काळेवाडी येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात एका महिलेला जीव गमवावा लागला आहे.
ही घटना दिनांक 31 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथील आशा संजय काळे (वय 45) या दळण ठेवण्यासाठी गिरणीकडे जात असताना, सासवड बाजूकडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनचालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात आशा काळे यांना गंभीर दुखापत झाली होती.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तत्काळ चिंतामणी हॉस्पिटल, सासवड येथे दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेबाबत फिर्यादी अक्षय राजेंद्र काळे (वय 32, रा. काळेवाडी, ता. पुरंदर) यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
या प्रकरणी सासवड पोलीस स्टेशन गुन्हा र. क्र. 424/2025 भा.दं.वि. कलम 106(1), 281, 125(a), 125(b) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184, 134/177 अन्वये अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तपास पोलीस हवालदार अभिजीत कांबळे (ब.क्र.1908) सुरु असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कार्यवाही चालू आहे.


Translate »
error: Content is protected !!