भोर तालुक्यातील पसुरे गावातील जिल्हा परिषद शाळांना बेंच वाटप
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे
पसुऱ्यात जि.प.शाळांना बेंच वाटप
भोर तालुक्याच्या भाटघर जलाशय किनारी वसलेल्या मौजे पसुरे येथील,पुणे जिल्हा परिषदेच्या सर्व सहा शाळांना ज्या डोंगरदऱ्यात आहेत त्या शाळांना सामाजिक कार्यकर्त्या विशाखा वैद्य यांचे माध्यमातून,युवा उद्योजक संतोष धुमाळ यांचे सहकार्यातून व पसुरे गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज धुमाळ यांच्या विशेष प्रयत्नातून बेंच व धनगरवस्तीवरील शाळेस फळा भेट देण्यात आला.
यावेळी युवा उद्योजक संतोष धुमाळ,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोज धुमाळ,सरपंच प्रवीण धुमाळ,उपसरपंच आनंद सणस,विकास सोसायटी मा. संचालक विजय धुमाळ,दत्तात्रेय धुमाळ,विशाल धुमाळ यांसह सर्व मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षिका,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
सर्व चिमुकल्यांना नवीन कोरे बेंच मिळाले याचे त्यांच्या चेहऱ्यावरील गोड हसू यातील आनंद त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता हीच खरी प्रेरणादायी बाब आहे.
ग्रामीण भागातील या शाळांना पुढील आधुनिक शिक्षणाच्या दृष्टीने आणखी मूलभूत व पायाभूत भौतिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे असे तंटामुक्त समिती अध्यक्ष पसुरे
मनोज धुमाळ यांनी सांगितले
अध्यक्ष – म.गां.तंटामुक्त समिती,पसुरे






