पुणे

राजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना 300 व्या जयंतीनिमित्त महिलांनी केले अभिवादन


सासवड प्रतिनिधी सह्याद्री माझा बापू मुळीक::

पुरंदरच्या पूर्व भागातील राजुरी येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना महिलांनी केले अभिवादन

सासवड (प्रतिनिधी) पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने पुरंदरच्या पूर्व भागातील राजुरी येथील ग्रामपंचायत कार्यालयात महिलांनी अहिल्याबाई यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन केले. राजुरी गावच्या सरपंच ईशा भगत,

उपसरपंच पुनम गायकवाड, बचत गटाच्या सीआरपी सीमा साळवे यांसह अनेक महिला या प्रसंगी उपस्थित होत्या. पुण्यश्लोक अहिल्याबाई यांच्या जयंती निमित्ताने एप्रिल महिन्यांत महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद व बँक ऑफ बडोदा यांच्या वतीने घेण्यात आलेल्या मोफत आरी वर्क प्रशिक्षणार्थी महिलांना यावेळी प्रशस्ती पत्रक वाटप करण्यात आले. याउपक्रमाचे मंगेश माने याप्रसंगी उपस्थित होते.

बिकट परिस्थितीत पती व सासरे यांच्या निधनानंतर
अहिल्याबाई यांनी धैर्याने राज्यकारभार केला व अनेक धार्मिक व सामाजिक उपक्रमांची उभारणी केली त्यांचा हा वसा व विचार ग्रामीण भागातील महिलांनी आत्मसात करावा असे आवाहन सरपंच ईशा भगत यांनी या वेळी केले.

आजच्या दिवसाचे औचित्य साधून सीमा साळवे यांना अहिल्याबाई महिला सन्मान पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. अश्विनी भगत, हर्षा भगत ज्योती भगत प्राजक्ता भगत यांसह आरी वर्क प्रशिक्षण पुर्ण केले ल्या सर्च महिला याप्रसंगी उपस्थित होत्या.


Translate »
error: Content is protected !!