पुणे

पुणे जिल्हा अंजीर व सिताफळ बागायतदार संघ स्थापनेचा निर्णय; विजय कोलते यांची माहिती


मुख्य संपादक हनुमंत वाबळे::

पुणे जिल्हा अंजीर व सिताफळ बागायतदार संघ स्थापनेचा निर्णय
विजय कोलते यांची माहिती

पुणे जिल्ह्यातील अंजीर व सिताफळ बागायतदारांची संख्या मोठी आहे. या शेतकऱ्यांना संघटित करून नवीन तंत्रज्ञान, कृषी विद्यापीठांच्या शिफारसीनुसार आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने ‘पुणे जिल्हा अंजीर व सिताफळ बागायतदार संघ’ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सासवड येथे झालेल्या बैठकीत या संघटनेच्या स्थापनेबाबत चर्चा झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे माजी उपाध्यक्ष विजय कोलते होते. या वेळी बोलताना कोलते म्हणाले,
“वेळोवेळी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून, शिफारसीप्रमाणे शेती केल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संपन्नता येऊ शकते.”

या नव्याने स्थापन होणाऱ्या संघाची नोंदणी सहाय्यक धर्मादाय आयुक्त यांच्यामार्फत करण्यात येणार असून, जिल्ह्यातील अंजीर व सिताफळ बागायतदारांनी या संघात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र सिताफळ संघाचे संचालक माऊली मेमाणे यांनी केले.

बैठकीस विजय पवार (इंदापूर), प्रदीप अहिर (जुन्नर), समीर डोंबे (दौंड), नितीन तावरे, दीपक जगताप (बारामती), निलेश काळे, संतोष मस्के, देवराम काळे, शांताराम पोमण, पांडुरंग काळे (पुरंदर) तसेच जिल्ह्यातील अनेक शेतकरी उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!