एखतपुर मुंजवडी गायरान परिसरात सात हजार झाडांची वृक्ष लागवड; विमानतळ बाधित शेतकऱ्यांनी जल आंदोलन करत कऱ्हा नदीच्या तीरावर जलपूजन
मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एखतपुर- मुंजवडी गायरान परिसरात सात हजार झाडांची ‘वृक्ष लागवड ‘जल आंदोलन करा नदीच्या तीरावर जल पूजन; तर माती आंदोलन कुंभारवळण चौकात शेतकऱ्यांनी आपल्या शेत मातीचे पूजन करून “माती हीच खरी आई”
सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक पर्यावरण दिन विशेष उपक्रम पुरंदरच्या भूमी, पाणी व पर्यावरण रक्षणासाठी जागर आयोजक सर्व पुरंदर तालुक्यातील निसर्गप्रेमी शेतकरी, तरुण, ग्रामस्थ,पुरंदर विमानतळ प्रकल्पामुळे नष्ट होणाऱ्या पर्यावरणासंदर्भात जनजागृतीसाठी ५ जून २०२५ रोजी, पर्यावरण दिनाचे औचित्य साधून, तालुक्यातील नागरिकांनी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने
आंदोलनात्मक उपक्रम राबवले.प्रमुख उपक्रम आणि त्यामागील संदेश वृक्षलागवड:
एखतपूर-मुंजवडी गायरान परिसरात ७,००० झाडांची वृक्षलागवड करण्यात आली. वड, पिंपळ, उंबर यांसारख्या पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाच्या वृक्षांची निवड करण्यात आली. जल आंदोलन:
कऱ्हा नदीच्या तीरावर जलपूजन करून “नदी म्हणजे “जीवनवाहिनी” हे प्रत्यक्ष कृतीतून अधोरेखित करण्यात आले.माती आंदोलन:
कुंभारवळण चौकात शेतकऱ्यांनी आपल्या शेतमातीचे पूजन करून, “माती हीच खरी आई” असा भावनिक संदेश दिला. भाकरी आंदोलन – तात्पुरते पुढे ढकलले:
काही शासकीय निर्बंध व कायदेशीर प्रक्रियेचा आदर राखून, नियोजित भाकरी आंदोलन १३ जून नंतर घेतले जाईल. याची नोंद सर्वांनी घ्यावी.प्रमुख मागण्या:
1)पर्यायी जागा अस्तित्वात असताना पुरंदर तालुक्यातील सुपीक, जलसंपन्न जमिनीवर विमानतळाचा अट्टहास का?
2) १० कोटी रुपये एकरी मोबदला हा शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा पर्याय ठरू शकत नाही. आम्हाला पैसा नाही – आमचं गाव, माती, जीवन हवं आहे.
3) शाश्वत विकासात निसर्ग, शेतकरी, जैवविविधता यांचा सन्मान झाला पाहिजे.पुरंदरकरांचा आवाज शासना पर्यंत पोहोचावा यासाठी:
“तुमचा न्यायधोरणाचा आवाज शेतकऱ्यांसाठीही असावा अशी आमची विनंती आहे.”
आमचा लढा कोणत्याही पक्षविरोधात नाही, तर पर्यावरण, पिढ्यांचा भवितव्य, आणि संविधानाने दिलेल्या हक्कांवर आधारित आहे.ही आंदोलन मालिका राजकारणाच्या पलीकडे जाऊन – भविष्यासाठी लढणाऱ्या ग्रामीण जनतेचा पर्यावरणविषयक आवाज आहे.त्याला योग्य स्थान व व्यासपीठ द्यावे.”विकास हवा – पण विनाश नको!”पर्यावरण वाचवा – पुरंदर वाचवा!पुरंदर विमानतळ विरोधी कृती समिती संपर्क गाव खानवडी






