सासवड आगारात साजरा झाला एसटी चा वाढदिवस
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::
सासवड आगारात साजरा झाला एस टी चा वाढदिवस
सासवड (प्रतिनिधी) सर्वसामान्यांची जीवनवाहिनी, लालपरी म्हणजेच एस टी चा ७७ व्वा वाढदिवस सासवड येथील आगारात साजरा करण्यात आला. रंगीबेरंगी फुगे, फुलांच्या माळा, सुंदर रांगोळी, एस टी ची छोटी प्रतिकृती
केक कापून व उपस्थित प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन हा सोहळा पार पडला. आगार प्रमुख सागर गाडे, स्थानक प्रमुख प्रवीण माळशिकारे,मासूम संस्थेच्या जया नलगे, जेष्ठ पत्रकार हेमंत ताकवले ,प्रवाशी संघटनेचे तानाजी सातव, नगरपालिका पथारी संघटनेचे गुलाब सोनावणे यांसह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.
एस टी चे उत्पन्न, खाजगीकरणाकडे होत असलेली वाटचाल, बेकायदेशीर प्रवाशी वाहतूक, काही उपाय व सूचना करत यावेळी उपस्थित हेमंत ताकवले, जया नलगे श्रीकांत लक्ष्मी शंकर, तानाजी सातव, गुलाब सोनावणे यांनी या प्रसंगी आपली मनोगते व्यक्त करत उपक्रमास शुभेच्छा दिल्या.
आगार प्रमुख सागर गाडे यांनी एस टी ची
सद्यस्थिती, प्रवाशांनी दिलेली साथ, भविष्यातील काही तरतुदी व उपाय योजना यांवर भाष्य केले. वाहतूक नियंत्रक पोपट जैनक यांनी सूत्रसंचालन केले तर संघटनेचे
कैलास जगताप यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले
कार्यक्रमास प्रवीण गायकवाड, महेश भोंगळे, विकास काकडे, सुजाता बर्गे, नितीन ओंबळे, गंगा मोरे,रामभाऊ
गावडे, मासूम संस्थेच्या महिला भगिनी, देवा भालेराव,
यांसह अनेक मान्यवर मंडळींनी कार्यक्रमास हजेरी लावली.






