उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदर मध्ये विविध उपक्रमांचे आयोजन खासदार सुनेत्रा ताई पवार यांचा आज पुरंदर दौरा
मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुरंदरमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन
पुरंदर, ता. १९ : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (पुरंदर) आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुरंदर तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी खासदार सुनेत्रा ताई पवार या उपस्थित राहणार असून उद्या त्या पुरंदरच्या दौऱ्यावर असणार आहेत.
या उपक्रमांमध्ये शेतकऱ्यांसाठी शेती उपयोगी साधनांचे वाटप, भजनी मंडळ साठी साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूंचे वितरण, महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर तसेच भव्य रक्तदान शिबिर यांचा समावेश आहे. याशिवाय आज पुरंदरमध्ये भव्य सायकल स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते.
ही सर्व कार्यक्रममालिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुरंदर-हवेली कार्याध्यक्ष वामन तात्या जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य दत्ता झुरंगे, तालुका अध्यक्ष उत्तम बापू धुमाळ, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष अमित झेंडे, जिल्हा उपाध्यक्ष राहुल गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शरद जगताप, माजी नगरसेवक गणेश जगताप, सासवड शहर अध्यक्ष उमेश भैय्या जगताप, सुकलवाडीचे सरपंच संदेश पवार, वीर देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र धुमाळ, रामसर जगताप यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
संपूर्ण तालुक्यात हे उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार असून नागरिकांनी कसा फायदा घ्यावा जगताप यांनी सांगितले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात येत आहे.






