पुणे

पुरंदरच्या गटविकास अधिकारी पदी प्रणोती श्रीमाळ, शिक्षक समिती व शिक्षक पतसंस्थेतून त्यांचं स्वागत


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::

गटविकास अधिकारी पदी प्रणोती श्रीमाळ

सासवड प्रतिनिधीबापू मुळीक पुरंदर तालुका पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदी प्रणोती श्रीश्रीमाळ(श्रेणी-१) यांची नेमणूक करण्यात आली.त्यानुसार श्रीश्रीमाळ यांनी नुकताच पदभार स्वीकारला.

प्रणोती श्रीश्रीमाळ या महाराष्ट्र लोकसेवा आयोग (२०१०) पोलिस उपनिरीक्षक पदी मुंबई पोलिस दलात कार्यरत होत्या.तद्नंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोग (२०१४) गटविकास अधिकारी पदी निवड झाली.धामणगाव रेल्वे(जि.अमरावती) मानवत(जि.परभणी)येथे गटविकास अधिकारी म्हणून तर ग्रामसेवक प्रशिक्षण मांजरी येथे व्याख्यात्या होत्या.

शिक्षण विस्तार अधिकारी गोविंद लाखे,पुरंदर तालुका प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनिल कुंजीर, संघाचे अध्यक्ष संदीप कदम,शिक्षक पतसंस्थेच्या मा.सभापती संगीता हिंगणे, जिल्हा सरचिटणीस मधुबाला कोल्हे,शिक्षक नेते मनोज सटाले,लतिफ इनामदार,प्रकाश जगताप,संदीप कुंभार यांनी श्रीश्रीमाळ यांचे स्वागत व अभिनंदन केले.


Translate »
error: Content is protected !!