ममता बालसदन मधील 18 अनाथ मुलींना शासकीय कागदपत्रे मिळाल्याने मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग मोकळा
सह्याद्री माझा —
ममता बाल सदन मधील 18 अनाथ मुलींना शासकीय कागदपत्रे मिळाल्याने मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग मोकळा
सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
कुंभारवळण( ता. पुरंदर) येथील पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदन, कुंभारवळण येथे राहत असलेल्या 18 अनाथ मुलींना जन्म प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, तसेच अनाथ प्रमाणपत्र देण्यात आली,
या महत्त्वपूर्ण शासकीय कागदपत्रांच्या आधारे या मुलींना शासकीय विविध योजना, शैक्षणिक संधी, आणि सामाजिक सुविधांचा लाभ घेता येणार असून, त्या समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी सक्षम बनतील, या उपक्रमामध्ये उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे,
तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बर्डे, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी( सासवड पोलीस स्टेशन )तसेच पुरंदर कृषी अधिकारी सुरज जाधव आणि इतर प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती लाभली,
या कार्यक्रमातून प्रशासनाने सामाजिक बांधिलकीची भूमिका बजावत, अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. संस्थेतील कार्य आणि या उपक्रमाबाबत उपस्थितांनी समाधान व्यक्त करत, मुलींना उज्वल भवितव्याबद्दल शुभेच्छा दिल्या. यासाठी ममता बालसदनमधील दिपक गायकवाड यासह, कर्मचारी वर्ग, स्टाफ, गावातील पदाधिकारी, आदी उपस्थित होते.






