पुणेमहाराष्ट्र

शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुरंदर विमानतळाचा निषेध


मुख्य संपादक हनुमंत वाबळे:::

शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्प
हार अर्पण करून पुरंदर विमानतळाचा निषेध

सासवड प्रतिनिधी:बापू मुळीक शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून, सासवड शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास आज पुरंदर विमानतळ बाधित शेतकऱ्यांनी, पुष्पहार अर्पण केला आणि शासनाच्या अन्यायकारक धोरणाचा तीव्र निषेध केला.

ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांच्या गवताच्या काडीलाही धक्का लागू दिला नाही, त्याच पवित्र भूमीत, आजचे राज्यकर्ते सात गावांतील शेतकऱ्यांची सुपीक शेती नष्ट करण्याचा कट रचत आहेत. हा अपमान शिवरायांच्या मूल्यांचा आहे आणि याविरोधात आम्ही एकजुटीने लढा देणार आहोत.

विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा पुरंदर विमानतळ प्रकल्प हा लोकशाही, पर्यावरण व कृषी संस्कृती यांवर गदा आणणारा आहे. शासनाने हा प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

यावेळी अनेक शेतकरी, युवक, शिवप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. “शिवरायांच्या महाराष्ट्रात शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही” हा निर्धार या आंदोलनातून व्यक्त झाला.


Translate »
error: Content is protected !!