श्रीक्षेत्र कानिफनाथ गड विकास कामाचा भूमिपूजन समारंभ आमदार विजय बापू शिवतारे यांच्या हस्ते संपन्न तब्बल 50 लाख रुपयाचा निधी उपलब्ध
तरुणांनी अध्यात्माची कास धरावी – आ.विजय शिवतारे
बोपगाव येथील श्रीक्षेत्र कानिफनाथ गडावर विकास कामांचा भूमिपूजन समारंभ
पुरंदर दि. २२(सह्याद्री न्यूज प्रतिनिधी सचिन गोंधळी)
सध्या तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे झुकल्याचे दिसत आहे. व्यसनांमुळे आयुष्याची राखरांगोळी होते. यावर उपाय म्हणून तरुणांनी अध्यात्माची
कास धरावी असे आवाहन पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांनी सांगितले.
बोपगाव (ता. पुरंदर)येथील श्रीक्षेत्र कानिफनाथ गड येथे पालखी मार्गावर पेव्हिंग ब्लॉक बसविणे(१० लक्ष), मंदिर वाहनतळ परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे(१०लक्ष), मंदिर परिसर सुधारणा
करणे(१०लक्ष), प्रदक्षिणा मार्ग रस्ता काँक्रिटीकरण करणे(१० लक्ष), जिल्हा नियोजन फंडातून कानिफनाथ गड मुख्य रस्ता करणे (गोरख फडतरे ते बाळासाहेब पवार घर रस्ता १०.५०लक्ष) इत्यादी
विकासकामांचे भूमिपूजन श्री. शिवतारे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी जि.प. सदस्य दिलीप यादव, पुणे मा. नगरसेवक महेश जगताप, पुरंदर पंचायत समिती उपसभापती दत्ताशेठ काळे, उद्योजक राजाराम झेंडे, विशाल रावडे, अनिल ढवळे, मनोज वाडकर, अमोल भोराडे, म्हस्कू कटके, दादासाहेब जगदाळे,
नंदकुमार फडतरे, तुळशिराम गोफणे, बाळासाहेब फडतरे, दिपक ब. फडतरे, बाळासो ब.फडतरे, पांडुरंग फडतरे, तुकाराम जगदाळे, विनायक गायकवाड, बाळूतात्या फडतरे, उत्तम फडतरे, समाधान भोसले, कुंडलिक फडतरे, पांडुरंग बाठे, संतोष गोफणे, साहेबराव फडतरे, राजेंद्र फडतरे, अमित जगदाळे, सरपंच ज्योती फडतरे, सरपंच स्वाती फडतरे, ग्रामसेविका राखी ढगारे, आशिष निगडे,गडाचे आर्किटेक्ट प्रभाकर कामठे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन नवनाथ देवस्थान पंचायत कमिटी ट्रस्ट अध्यक्ष माऊली फडतरे, उपाध्यक्ष दीपक फडतरे, सचिव जयवंत फडतरे, खजिनदार नागेश फडतरे, संचालक सुरेश फडतरे, नितीन फडतरे, महादेव फडतरे, सोनबा फडतरे, प्रकाशभाऊ फडतरे यांनी केले.
पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र कानिफनाथ गड हे आध्यात्मिक शक्ती केंद्र असून लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला सर्व सुख सोयी उपलब्ध झाल्या पाहिजेत. श्रीक्षेत्र कानिफनाथ गडाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. श्री शेत्र कानिफनाथ गडावर वर्षभर अन्नदानाचा कार्यक्रम चालू असतो. काही कमतरता भासल्यास माझ्या शिवतारे कुटुंबीयांच्या वतीने सर्व मदत करण्यात येईल. पुरंदर तालुक्यात सध्या अपघातांचे प्रचंड प्रमाण वाढलेले आहे. अनेक जण मृत्युमुखी पडलेले आहेत. सर्वांनी खबरदारी घेऊन अपघातांचे प्रमाण कमी करावे. आमदार विजय शिवतारे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊली फडतरे यांनी केले सूत्रसंचालन सुरेश सर फडतरे यांनी केले.
दादासाहेब जगदाळे यांनी आभार मानले.






