ताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

महिलांना अडचणी असल्यास पोलिसांशी संपर्क करावा भोर पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे,पोलीस स्टेशन मध्ये महिला दिन साजरा, छायाताई नानगुडे, परविन पानसरे यांचं उत्तम नियोजन


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा
महिलांना अडचणी असल्यास पोलिसांशी संपर्क साधा तानाजी बरडे

सासवड (प्रतिनिधी) स्रिया या आता प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे येत आहेत राज्याच्या ते न्यायाधीशांपर्यंत महिला पुढे येत आहेत अनेक महिला या आपले कौटुंबिक जबाबदारी पार पडून उच्च स्थानावर पदभार स्वीकारत

आहेत. कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरणे घडत असून अशा महिलांनी आपल्या परिसरात असणाऱ्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या काही महिला यांच्या माध्यमातून पोलिसांपर्यंत आल्या तर या महिलांना

आम्ही सर्वतोपरी मदत करू असे पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे यांनी सांगितले.

सासवड (ता पुरंदर) येथे सासवड पोलीस स्टेशन, भूमाता महिला संघटना , ग्राहक कल्याण फाउंडेशन, माय मराठी न्युज, पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यामाने जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या

महिला व नगर परिषदेमध्ये स्वच्छतेचे काम करणाऱ्या महिला याचा सन्मान यावेळी करण्यात आला.

यावेळी बोलताना नारायणपूर देवस्थानचे व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर म्हणाले की महिलांचे कार्य हे खूप मोठे आहे या जगामध्ये मातेला सर्वात मोठी किंमत आहे. प्रत्येक घरात एक मुलगी आसली पाहिजे. आई-वडिलांना पाहिल्यानंतर सर्वात जास्त आनंद हा मुलींना होत असतो.

यावेळी सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, नारायणपूर देवस्थानचे व्यवस्थापक भरतनाना क्षीरसागर, सुनील धिवार, सुनील लोणकर, माय मराठी न्यूज चॅनलच्या संपादिका छायाताई नानगुडे, भूमाता ब्रिगेडच्या पुणे जिल्हा अध्यक्ष परविनताई पानसरे ,वंदना जगताप, प्रिया जगताप, कविता चौरे, कुमोदणी पांढरे, छाया सकट नीता सुभागडे

विजेता गायकवाड मोहन चव्हाण ज्योती गायकवाड हर्षदा पवार, प्राजक्ता नानगुडे, संदीप टिळेकर, मंगेश गायकवाड, प्रगती नाळे, अमोल बनकर निलेश भुजबळ शिवाजी सुळके, चंद्रकांत बोरकर,

सुभाष काळे, बबन काळे, संतोष काकडे, सोमेश्वर काळे उपस्थित.
कार्यक्रमाचे आयोजन भुमाता महिला ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष परविन पानसरे तालुकाध्यक्षा छाया नानगुडे, ग्राहकल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष रामदास मेमाणे, पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष योगेश कामथे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष काकडे, सूत्रसंचालन देवा भालेराव व आभार परविण पानसरे यांनी मानले.


Translate »
error: Content is protected !!