“इंडियाना ग्रेटिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड” कंपनीत रक्तदान शिबिरास उस्फूर्त प्रतिसाद- स्व गोविंद हिंगोराणी यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त आयोजन
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
इंडियाना ग्रीटिंग्स कंपनीच्या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
स्व. गोविंद हिंगोराणी यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त आयोजन – २०० हून अधिक रक्तदात्यांचा सहभाग
जेजुरी – इंडियाना ग्रीटिंग्स कंपनीचे संस्थापक आणि प्रसिद्ध उद्योजक स्वर्गीय गोविंद हिंगोराणी यांच्या ८० व्या जयंतीनिमित्त, कंपनीच्या वतीने तसेच हडपसर येथील ओम ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन कंपनीच्या परिसरात करण्यात आले होते.
या शिबिराला कंपनीतील कामगार, स्टाफ आणि व्यवस्थापनाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल २०० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपले योगदान दिले.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला ओम ब्लड बँकेच्यावतीने एक स्कूल बॅग भेट देण्यात आली. तसेच चहा, बिस्कीट व नाश्त्याचेही उत्तम आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास कंपनीचे विद्यमान मालक श्री. प्रशांत गोविंद हिंगोराणी यांनी विशेष उपस्थिती दर्शवून रक्तदात्यांना प्रोत्साहन दिले.
या उपक्रमाचे संपूर्ण नियोजन कंपनी व्यवस्थापन, एच.आर. विभाग, कामगार मंडळ, आणि ओम ब्लड बँक यांनी संयुक्तरित्या केले होते.
प्रमुख संयोजनकर्त्यांमध्ये संजय भरणे, शेखर बारबाई, मोहन चौंडकर, अतुल बनकर, विजय भोसले, अक्षय बारभाई, कैलास कामथे, संदीप थोपटे, राजेश डोळस, प्रवीण भोसले ,सुरेश साळुंखे ,सूर्यकांत साळुंखे, किशोर कामथे, भाऊसाहेब जगताप, सुनील खैरे, नितीन शेंडगे, प्रशांत भामे, अविनाश गायकवाड, निळकंठ गाडेकर, गणेश भापकर, शरद जगताप, सागर पवार, धनाजी मोरे,
विजय भोसले. प्रकाश कड ,कल्पेश मेमाणे, उमेश जाधव, विश्वास यादव, महेश ताकवले, संतोष भालगुडे, संदीप गायकवाड, सुनील मोरे, प्रवीण भोसले, गोरख जाधव, बाबा पालवे, शंतनु रोटे, अनिल कोळेकर, संतोष देवकर, प्रकाश घोडेकर, नारायण राजपूरे, फिरोज शेख यांचा समावेश होता.
ओम ब्लड बँकेचे श्री. गणेश पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिबिराचे वैद्यकीय व्यवस्थापन अत्यंत कौशल्याने पार पाडले.
या उपक्रमाबाबत एच.आर. विभागाचे श्री. मोहन चौंडकर यांनी सांगितले, “दरवर्षी आम्ही साहेबांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आणि इतर सामाजिक उपक्रम आयोजित करतो. यामुळे आम्हाला त्यांच्याविषयीचे प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळते.”






