पुरंदर तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात व पानंद रस्ते खुल्या संदर्भात पुरंदरचे तहसीलदार यांना निवेदन
सह्याद्री माझा प्रतिनिधी::–
पुरंदर तालुक्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळण्यासंदर्भात व पाणंद रस्ते खुले करण्याबाबत पुरंदरचे तहसीलदार यांना निवेदन
सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक पुरंदर तालुक्यातील शेतकरी बांधवांची अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची भरपाई, फळबागायतदारांचे विशेष करून ,आंबा उत्पादकांची फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना आंबा उत्पादकासाठी केलेला खर्चही वसूल होत नाही, त्यामुळे शेतकरी बांधव फार मोठ्या आर्थिक संकटात सापडले
असून, 130 ते 160 रुपये पर्यंत मिळणारा भाव हा, सध्या फक्त 30 ते 35 रुपये पर्यंत किलोच्या प्रमाणामध्ये झालेला असून, या अवकाळी पावसामुळे नुकसान हे शेतकऱ्यांचे झाले आहे. सर्व तालुक्यात पंचनामे करून, लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत पोहोचवण्याबाबत चर्चा ही त्या ठिकाणी करण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजीपाला, कांदा, भुईमुग, चारा, पीक इत्यादी पिकांचे
भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, नुकसान भरपाई शासनाकडून लवकरात लवकर शेतकऱ्यापर्यंत पुरंदर तालुक्यात पोच व्हावी, या संदर्भात पुरंदरचे तहसिलदार विक्रम राजपूत यांच्याकडे ही मागणी माजी आमदार अशोक टेकवडे व पुणे जिल्हा भाजपा उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम( दादा) जगदाळे यांनी केली
आहे. यावेळी संदीप कटके अध्यक्ष भाजपा पुरंदर तालुका (पश्चिम), संजय निगडे पुरंदर तालुका भाजपा (पूर्व), दिलीप कटके युवा मोर्चा अध्यक्ष, महादेव शेडकर किसान मोर्चाचे, गोरख मेमाणे, बजरंगजी किनाळे, आप्पा खवले, संदीप खवले, सुनील गोफणे, जयवंत साळुंखे आदी इतर मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.






