हडपसर – भेकराईनगर पापडेवस्ती येथून चिंतामणी भाऊसाहेब आरोटे वय वर्ष 26 हरवला आहे, सापडून देणारास योग्य बक्षीस
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
चिंतामणी आरोटे बेपत्ता; हडपसर पोलिसांत मिसिंग तक्रार
हडपसर : भेकराईनगर, पापडेवस्ती परिसरातील चिंतामणी भाऊसाहेब आरोटे (वय 26) हे दिनांक 23 सप्टेंबर 2026 रोजी घरातून कोणालाही काहीही न सांगता बाहेर पडले असून ते अद्याप घरी परतलेले नाहीत.
चिंतामणी यांचे वर्णन उंची 5.2 फूट, नाक सरळ, रंग सावळा आणि शरीरयष्टी मध्यम असे आहे. याबाबत त्यांचे भाऊ स्वप्निल भाऊसाहेब आरोटे यांनी हडपसर पोलीस स्टेशन येथे मिसिंग तक्रार दाखल केली आहे.
चिंतामणी आरोटे यांच्याबाबत कोणाला काही माहिती मिळाल्यास किंवा ते आढळून आल्यास तातडीने 9763937141 / 8999182578 या क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच हडपसर पोलीस स्टेशनशी संपर्क साधण्याचे आवाहन कुटुंबीयांकडून करण्यात आले आहे.






