शैक्षणिक

पारंपरिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षण आवश्यक – विजय कोलते


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
पारंपरिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षण आवश्यक – विजय कोलते

उद्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी जेन-झी पिढीला पारंपरिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक शिक्षण देणे आवश्यक आहे, असे मत संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष विजय कोलते यांनी व्यक्त केले.संस्थाचालक शिक्षण मंडळ, पुणे जिल्हा व अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू कॉलेज, पर्वती पायथा येथे आयोजित इयत्ता दहावी विद्यार्थी गुणगौरव समारंभात ते बोलत होते.

यावेळी संस्थाचालक शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष कृषिरत्न अनिल मेहेर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शिक्षणासोबतच नृत्य, वक्तृत्व, चित्रकला व सांस्कृतिक उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थाचालकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन कोलते यांनी केले.

पुरस्काराला उत्तर देताना अनिल मेहेर यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता व ऑटोमेशनसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण देण्याची गरज व्यक्त केली.

यावेळी शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर, आप्पासाहेब बालवडकर, प्रदीप वळसे-पाटील, प्रमिला गायकवाड, डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, वीरसिंह रणसिंग , शिवाजी खांडेकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. संग्राम कोंडे देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन सचिन धनवट यांनी केले, तर आभार महेश ढमढेरे यांनी मानले.


Translate »
error: Content is protected !!