पुणे

सासवड सुपा एसटी बस सेवा कधी सुरू होणार….


मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::

सासवड सुपा एसटी बस सेवा कधी सुरू होणार

सासवड प्रतिनिधी: (बापू मुळीक)सासवड आगारातून सुपा या ठिकाणी चालणारी बस सेवा सुरळीत चालू होती, परंतु आठ ते नऊ महिन्यांमध्ये सासवड सुपा रस्त्याचे काम सुरू झाल्यामुळे, मे मध्ये पाऊस झाल्याने, या रोडची खूप दयनीय अवस्था झालेली आहे. ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात खड्डे पडलेले आहेत, रोजच्या शेतीमध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे .

पूल सुद्धा पाहिजे असे गावागावात ओढयाच्या ठिकाणी व्यवस्थित पाईप टाकून व्यवस्थित केलेले नाहीत, निकृष्ट पद्धतीचे कामकाज चाललेले आहे, त्यामुळे त्याचा थेट परिणाम तर नायगाव ग्रामपंचायतच्या मालमत्ता चे भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे, विद्यार्थ्यांची गैरसोय सासवड व सुपा या ठिकाणी शाळेसाठी जाण्यासाठी होत आहे, सामान्य नागरिक ग्रामस्थ खूप या गोष्टीमुळे त्रस्त झालेले आहेत.

नायगाव, राजुरी, रिसेपिसे या परिसरातील शेतकऱ्यांचा, नोकरदार विद्यार्थी व्यापारी यांचा प्रवास चिखलामुळे गावी जाणे सुद्धा अवघड होऊन बसले आहे .राजपथ इनफा कंपनीला शेतकरी यांनी संपर्क केले असता, कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. राजुरी, रिसेपिसेच्या गावाच्या प्रवासासाठी एसटी सेवा तर अद्याप पर्यंत बंद आहे. फक्त सासवड ते नायगाव पर्यंत एसटी चालू आहे, यावर पुरंदर हवेली चे लोकप्रतिनिधी हे विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी, व्यापारी यांच्या प्रवासासाठी एसटी सेवा पूर्ववत करणार का? हा सामान्य नागरिकांचा महिना झाला पडलेला एक त्यांना प्रश्न आहे, प्रामुख्याने विद्यार्थीना शाळेसाठी व शेतकरी यांना शेतमाल तयार चालू झाल्यानंतर या ठिकाणी रोडवरून जाताना सासवड सुपा या भागांमध्ये कसा प्रवास करावा, हा शेतकऱ्यांना एक प्रश्न पडलेला आहे. यावर पुरंदर हवेलीचे लोकप्रतिनिधी सामान्य नागरिकांसाठी, शेतकऱ्यासाठी, विद्यार्थ्यांच्या साठी, व्यापारासाठी कधी एसटी सासवड सुपा चालू करणार? सुपे हे शैक्षणिक आणि व्यापारी दृष्टिकोनातून केंद्रबिंदू असल्याने,या मार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात लोकांची येजा असते,या परिसरातील अनेक विद्यार्थी हे सुपा येथे शिक्षणासाठी जातात, तर अनेक ग्रामस्थांचे जीवनमान व व्यवहार हे सुद्धा सुपा बाजारपेठेला जोडलेले आहेत, या परिसरातील जेष्ठ नागरिक महिला व विद्यार्थ्यांसाठी

पर्यायी वाहतुकीची कोणतीही सुविधा या ठिकाणी उपलब्ध नाही. रिसेपिसे, राजुरी येथील विद्यार्थ्यांना अक्षरशा: सासवड या ठिकाणी तर रूम घेऊन शाळेसाठी थांबावे लागत आहे, या सर्व प्रकरणाला राजपथ इन्फ्रा कंपनी जबाबदार आहे. त्यामुळे सासवड आगाराची बस सेवा ही लवकरात लवकर सुरळीत व्हावी, अशी मागणी ग्रामस्थ, पालक, व प्रवाशांनी केली आहे.


Translate »
error: Content is protected !!