पुणे जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीतून – जगन्नाथ शेवाळे
मुख्य संपादक हनुमंत वाबळे::
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::
पुणे जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीतून
सासवड प्रतिनिधी:(बापू मुळीक) सध्याच्या परिस्थितीमध्ये पुणे जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महाविकास आघाडीतूनच लढविल्या जातील, असे प्रतिपादन पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी सासवड येथे पक्ष कार्यालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
त्यांनी इच्छुक उमेदवारांना, क्रियाशील सभासद नोंदणी करून, जनसंपर्क वाढवण्याचे आव्हाने केले. तालुकाध्यक्ष माणिक झेंडे यांनी तालुक्यातील पक्षीय कामकाजाचा आढावा घेतला, जिल्ह्यातील पक्षाच्या विविध कमिटीच्या कामकाजाची माहिती जिल्हा युवा अध्यक्ष प्रवीण गोतारने, सागर मिसाळ,
स्वराज तुपे, आणि महिला अध्यक्ष भारती शेवाळे यांनी दिली. आता येणारे निवडणुकांमध्ये युवकांना अधिक संधी मिळावी, अशी मागणी सौरभ कुंजीर, सचिन दरेकर, संतोष कोलते, बंडुकाका जगताप, गौरव कोलते यांनी केली
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय कोलते, सुदाम इंगळे, हेमंतकुमार माहूरकर, दत्ता चव्हाण, राहुल गिरमे, बाजीराव कुंजीर, पुष्कराज जाधव यांनी पक्ष एकजुटीने जास्तीत जास्त जागांवर यश मिळवेल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. शहर अध्यक्ष विनोद जगताप यांनी आभार मानले.






