राजकीय

नीरा कोळविहिरे गटात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक साठी भाजपमध्ये इच्छुकांची गर्दी


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
उपसंपादक नवनाथ राणे:
निरा–कोळविहिरे गटात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी

कोळविहिरे येथे ११ गावांच्या कार्यकर्त्यांची मनोगत सभा उत्साहात संपन्न
सासवड प्रतिनिधी :
आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निरा–कोळविहिरे गटात राजकीय हालचालींना वेग आला असून या गटातून निवडणूक लढविण्यास इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने दि. ८ जानेवारी २०२६, गुरुवार रोजी कोळविहिरे येथे गटातील ११ गावांच्या भाजपा कार्यकर्त्यांची मनोगत सभा मोठ्या उत्साहात पार पडली.

या सभेस पुरंदर–हवेलीचे माजी आमदार संजय जगताप, माजी आमदार अशोक टेकवडे, भाजपा जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गंगाराम जगदाळे, सचिन लंबाते, संजय निगडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीस गुळूंचे, कर्नलवाडी, राख, नावळी, जेजुरी ग्रामीण, कोळविहिरे, मावडी, काप, जवळा, अर्जुन, पिंगोरी आदी गावांतील कार्यकर्ते व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आपली मते आणि अपेक्षा व्यक्त केल्या.

मान्यवरांनी सर्व कार्यकर्त्यांची मते लक्षात घेऊन पक्ष जो उमेदवार देईल, त्याच्या पाठीशी एकजुटीने उभे राहून काम करण्याचे आवाहन केले. यास उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखाने पक्षाच्या उमेदवारासाठी काम करण्याची तयारी दर्शविली.

निरा–कोळविहिरे गटातील ११ गावांमध्ये एकूण २९ मतदान बूथ असून तळागाळातील मतदारांपर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या योजना व विकासकामांची माहिती पोहोचविण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला.
या संपूर्ण बैठकीचे नियोजन महेश खैरे यांनी केले. दरम्यान, लवकरच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.


Translate »
error: Content is protected !!