राजकीय

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्षपदी विजय कोलते यांची निवड


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्षपदी विजय कोलते यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी श्री.विजय विनायक कोलते यांची नियुक्ती करण्यात आली. प्रदेश राष्ट्रवादीची बैठक पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव पवार , कार्याध्यक्ष खा.सौ. सुप्रिया सुळे, खा. डॉ. अमोल कोल्हे, आमदार जयंत पाटील यांचे उपस्थितीत मुंबई येथे पक्ष कार्यालयात पार पडली.

या बैठकीत प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी विजय कोलते यांच्या निवडीची घोषणा करून नियुक्तीपत्र दिले आहे. पक्षाने पुणे जिल्ह्यासाठी बारामती व शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बारामती साठी विजय कोलते व शिरूर साठी ॲड.देवेंद्र निकम यांना अध्यक्षपदी निवडण्यात आले. बारामतीचे कार्याध्यक्षपदी मुळशी तालुक्याचे माजी सभापती महादेव कोंढरे यांची निवड करण्यात आली.

विजय कोलते यांनी पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद (सन 1992 ते 1997) भूषविले आहे. पुणे म्हाडा सभापती, कृषी परिषदेचे उपाध्यक्ष व रयतचे विभागीय अध्यक्षपद या पदावर त्यांनी काम केले आहे.

निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री कोलते म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व तालुक्यात माझा संपर्क चांगला आहे . त्यामुळे पक्ष वाढीसाठी त्याचा उपयोग होईल. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तरुणांना प्राधान्य देऊन यश मिळवू.


Translate »
error: Content is protected !!