पुणे

सामाजिक भावनेतून पुणे गृह निर्माण मंडळाकडून सासवडच्या कॉलनीत वृक्षारोपण


संपादक हनुमंत वाबळे::
सासवड प्रतिनिधी बापू मुळीक::

सामाजिक भावनेतून पुणे गृह निर्माण मंडळाकडून सासवडच्या कॉलनीत वृक्षारोपण..

सासवड प्रतिनिधी बापू मुळीक: पुणे गृह निर्माण व क्षेत्र विकास महामंडळ अर्थात म्हाडा या संस्थेच्या वतीने पर्यावरण रक्षणासाठी त्यांच्या जिल्ह्यातील वसाहतींमध्ये सध्या वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यात आली आहे.

याच मोहिमेअंतर्गत सासवड येथील अंबोडी रस्त्यावरील म्हाडा
वसाहतीत महामंडळ आणि स्थानिक नागरिक यांच्या सहभागातून वृक्षारोपण करण्यात आले. सदरच्या कार्यक्रमात तरूणाईचा विशेष सहभाग होता. सदरची झाडे वाढवण्याची व पुढील वर्षी त्यांचे वाढदिवस साजरे करण्याची ग्वाही तेथील स्थानिकांनी दिली.

वृक्षारोपण बरोबरच वसाहतीतील अंतर्गत रस्ते, विद्युत पुरवठा, संरक्षक भिंत व शिल्लक असणाऱ्या सदनिकांची
विक्री यावर गृह निर्माण मंडळ विशेष लक्ष देणार असल्याचे कार्यक्रमप्रसंगी उपस्थित असलेल्या म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


Translate »
error: Content is protected !!