वृत्तपत्र वितरकाचा असाही एक सन्मान… सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांचा उपक्रम!!!
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
वृत्तपत्र वितरकाचा असाही एक सन्मान… माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे यांचा उपक्रम
सासवड : दिवाळीच्या मंगलमय वसुबारस दिनी आणि नुकत्याच पार पडलेल्या जागतिक वृत्तपत्र विक्रेता दिनाच्या पार्श्वभूमीवर सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र कुंडलिक गिरमे यांनी एक आगळीवेगळी सामाजिक भावना जपली.
गिरमे यांनी शहरातील वृत्तपत्र वितरक शकील बागवान यांचा सन्मान करण्याचा एक वेगळाच मार्ग निवडला — त्यांनी बागवान यांच्या एका दिवसाच्या सर्व प्रमुख वृत्तपत्रांची किंमत स्वतः देऊन त्या दिवशी सर्व वाचकांना मोफत वृत्तपत्र वाटप केले.
या अनोख्या उपक्रमातून गिरमे यांनी वृत्तपत्र वितरकांच्या अथक परिश्रमाला आणि निष्ठेला अभिवादन केले. त्यांच्या या संवेदनशील कृतीचे शहरातील नागरिक, वाचकवर्ग आणि सासवड शहर पत्रकार संघ , पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाच्या यांच्या वतीने विशेष कौतुक करण्यात आले.
या प्रसंगी गिरमे यांच्यासमवेत तुषार राऊत, सुभाष भांडवलकर, सुनिकेत म्हेत्रे आदी मित्रपरिवार उपस्थित होता.






