पुणे

नाझरे जवळार्जुन शिवेवरील वजराईचा मळा शेखर टेकवडे वस्ती कडे जाणारा पूल पुराने गेला वाहून


पुरंदर प्रतिनिधी नवनाथ राणे::-

नाझरे जवळार्जुन शिवेवरील वजराईचा मळा शेखर टेकवडे वस्ती कडे जाणारा पूल पुराने गेला वाहून शासनाने ताबडतोब काम चालू करावे माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे

नाझरे जवळार्जुन शिवेवरील वजराईचा मळा शेखर टेकवडे वस्ती कडे जाणारा रस्ता येथील पूल पुराने वाहून गेला जवळार्जुन येथील वजराईचा मळा येथील ओढ्यावरील पूल पुराच्या पाण्याने वाहून गेला.तसेच लाईटचे खांब ही पडले.

त्यामुळे दळणवळणाची मोठी अडचण निर्माण झाली आहे. पुरंदर हवेलीचे मा. आमदार अशोक भाऊ टेकवडे तंटामुक्तीचे अध्यक्ष शिवाजी राणे, नागेश टेकवडे गणेश राणे, शेखर टेकवडे,

नवनाथ टेकवडे यांनी पडलेल्या पुलाची माहिती घेतली व यासंबंधी ग्रामपंचायतीला माहिती दिली व पुलाच्या दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी केली. जुन्या लोकांचे म्हणणे आहे 100 वर्षात मे महिन्यात इतका पाऊस कधी झाला नाही इतका पाऊस यावर्षी पडला.


Translate »
error: Content is protected !!