शैक्षणिक

प्रा. सौ. जयश्री रणधीर जगताप यांना पीएच.डी. पदवी प्रदान


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::

प्रा. सौ. जयश्री रणधीर जगताप यांना पीएच.डी. पदवी प्राप्त

सासवड (ता. पुरंदर) – पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी, सासवड येथील प्रा. सौ. जयश्री रणधीर जगताप यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची फार्मास्युटिकल केमिस्ट्री या विषयातील डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी प्राप्त झाली आहे.

त्यांच्या संशोधनाचा विषय “Design, Synthesis and Biological Evaluation of Some Heterocyclic Compounds as Antimicrobial Agents” असा होता. या संशोधन कार्यात त्यांनी तीन शोधनिबंध प्रकाशित केले असून, एक पेटंट सुद्धा प्राप्त केला आहे. याशिवाय, त्यांनी तीन शैक्षणिक पुस्तकांचे लेखन केले असून त्यांना १९ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे.

या संशोधन प्रक्रियेमध्ये त्यांना डॉ. मीनाक्षी देवधर व डॉ. राजश्री चव्हाण यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, उपाध्यक्ष मा. राजेंद्र घाडगे, मानद सचिव मा. अ‍ॅड. संदीप कदम, उपसचिव मा. एल. एम. पवार, खजिनदार मा. मोहनराव देशमुख, सहसचिव मा. ए. एम. जाधव तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. राजश्री चव्हाण आणि महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रा. जयश्री जगताप यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.


Translate »
error: Content is protected !!