शिक्षकांच्या अभावामुळे तोंडल ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप-ठिय्या आंदोलन सुरू
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
शिक्षकांच्या अभावामुळे तोंडल ग्रामस्थांनी ठोकले शाळेला कुलूप – ठिय्या आंदोलन सुरू
पुरंदर (दि. 28 जुलै 2025):
पुरंदर तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील तोंडल गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या अभावामुळे शिक्षणाचा दर्जा खालावल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून आजपासून शाळेला कुलूप ठोकून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
तोंडल गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातवीपर्यंत आहे.
सध्याची विद्यार्थी संख्या: 80 (पाचवीपर्यंत 62, सहावी-सातवी मिळून 18) शिक्षक फक्त 3 असल्याने नियमित वर्ग सुरळीत चालत नाहीत.
शाळेला मॉडेल स्कूल म्हणून निवड झाली असूनही शिक्षकांच्या अभावामुळे शिक्षणाची परिस्थिती गंभीर झाली आहे.
शिक्षक नसल्यामुळे अनेक पालकांनी आपल्या मुलांना पाच किलोमीटर दूर असलेल्या हायस्कूलमध्ये दाखल केले आहे.
या गंभीर परिस्थितीबाबत शाळा व्यवस्थापन समिती, पालक, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांची बैठक घेण्यात आली.
ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून एक खाजगी शिक्षक नियुक्त केला; तरीसुद्धा शासनाकडून आवश्यक शिक्षक उपलब्ध करून देण्यात आले नाहीत.याबाबत पंचायत समिती, पुरंदर येथे जाऊन गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे वारंवार मागणी केली, पण ती दुर्लक्षित झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे.
शेवटी, 28 जुलै 2025 रोजी ग्रामस्थांनी शाळेचे दरवाजे कुलूपबंद करून ठिय्या आंदोलन सुरू केले.
“शाळेसाठी शासकीय शिक्षक नेमला जाईपर्यंत आंदोलन सुरुच राहील,” असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनात सरपंच शरद वनवे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष केशव वनवे,पूजाताई तुंगतकर, श्याम नागरगोजे, कैलास वनवे, अश्रू वनवे, बळीराम वनवे,शामकांत वनवे (चेअरमन – तोंडल विकास सोसायटी), जावेद इनामदार, प्रतीक भोसले,ज्ञानेश्वर वनवे, बबन मोरे, तानाजी वनवे, स्वाती वनवे, शिवाजी वनवे,बाळासाहेब बाबर शिवा भाऊ वनवे लक्ष्मीबाई वनवे, राकेश तुंगतकर, चेतन वनवे, रामभाऊ नागरगोजे, गोरख वनवे
आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले.
ग्रामस्थांची मागणी शाळेला तत्काळ पदवीधर शिक्षक नेमावा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवावे शिक्षक न मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.






