पिसर्वे ग्रामपंचायत उपसरपंच पदी चंद्रकांत कोलते यांची बिनाविरोध निवड
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
उपसंपादक नवनाथ राणे::
पिसर्वे ग्रामपंचायत उपसरपंच पदी चंद्रकांत कोलते यांची बिनविरोध निवड.
पुरंदरच्या पूर्व भागातील मोठे असणाऱ्या पिसर्वे गावच्या उपसरपंच पदी चंद्रकांत उर्फ बापू विठ्ठल कोलते वय (45)वर्ष यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच रवींद्रआबा कोलते यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामपंचायतीच्या बैठकीत चंद्रकांत कोलते यांचा एकमेव अर्ज आल्याने बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. शंकरराव कोलते विद्यालयाला एक एकर जमीन बक्षीस पत्राने देऊन या कुटुंबांनी मानाचे स्थान मिळवले आहे. सध्या ते “रयत”च्या स्थानिक स्कूल कमिटीमध्ये सदस्य आहेत. तसेच पुरंदर उपसा सिंचन योजनेतून केलेल्या शरद- विजय पाणी वाटप सोसायटीचे ते सचिव आहेत.
त्यांच्या निवडीबद्दल पुणे जिल्हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे सरचिटणीस विजय कोलते, माजी उपसरपंच महेश वाघमारे, सुनील कोलते, माजी सरपंच संभाजी कोलते, बाळासाहेब कोलते व पंचायत समितीच्या माजी सदस्य सौ सुनिताकाकी कोलते यांनी अभिनंदन केले.






