पुणे

श्री संत सोपान काका पंचक्रोशी पालखीचे जवळार्जुन मध्ये भव्य स्वागत


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे:
संपादक सह्याद्री माझा नवनाथ राणे:
श्री संत सोपान काका पंचक्रोशी पालखीचे जवळार्जुन येथे भव्य स्वागत

जवळार्जुन (ता. पुरंदर) — श्री संत सोपान काका पंचक्रोशी पालखी प्रदक्षिणेचे जवळार्जुन गावात आज रविवार, दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 9 वाजता पांडेश्वरहून आगमन झाले. पालखीच्या स्वागतासाठी गावातील रस्त्यांवर घरोघरी रांगोळ्या काढून, फुलांनी आणि टाळमृदुंगाच्या गजरात भाविकांनी स्वागत केले.

वारकऱ्यांसाठी नाश्ता, दूध व चहाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. पालखीचे स्वागत जवळार्जुनचे मा. सरपंच अण्णासाहेब राणे, सरपंच सोमनाथ कणसे, ह.भ.प. मोहन महाराज पवार, नवनाथ टेकवडे, चंदाबापू टेकवडे, आकाश दळवी, मधुकर राणे, रामकृष्ण राणे, जालिंदर टेकवडे, बाळासो कावडे, निलेश टेकवडे, पत्रकार नवनाथ राणे तसेच समस्त ग्रामस्थ व जवळार्जुन भजनी मंडळ विठ्ठलवाडी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

या वेळी ह.भ.प. माऊली महाराज कदम, सुधाभाऊ गिरमे व इतर वारकऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. ग्रामस्थांतर्फे पालखीला देणगी अर्पण करण्यात आली. सर्व भाविकांनी शांततेत सोपान काकांचे दर्शन घेतले.

यानंतर सकाळी 11 वाजता पालखीने नाझरेकडे प्रस्थान केले.


Translate »
error: Content is protected !!