श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर सासवड येथे रामेश्वर शिवलिंग मंदिराचे भूमिपूजन संपन्न
सासवड प्रतिनिधी सह्याद्री माझा::
श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर सासवड येथे रामेश्वर शिवलिंग मंदिराचे भूमिपूजन संपन्न
सासवड शहरातील कर्हा नदीच्या काठावर वसलेल्या प्राचीन श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरात रामेश्वर शिवलिंग मंदिराचे भूमिपूजन दुसऱ्या श्रावण सोमवारी अत्यंत धार्मिक वातावरणात पार पडले.
या मंदिराचे बांधकाम करण्याचा सौजन्यपूर्ण संकल्प सासवड येथील प्रसिद्ध उद्योजक श्री सुभाष अण्णा मारणे यांनी केला असून, भूमिपूजन समारंभ पुरंदर-हवेलीचे माजी आमदार श्री संजय चंदूकाका जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला.
कार्यक्रमाला सासवड शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते, त्यामध्ये प्रमुख उपस्थिती:
आनंद जगताप (भाजप युवा अध्यक्ष, सासवड) ,गणेश मुळीक, मोहन आप्पा जगताप, जयेंद्र निकम प्रा. शशिकांत काकडे, संदीप जगताप, नानासाहेब मारणे ,अजित जगताप (माजी नगरसेवक), संजय अण्णा जगताप ,रमेश कारभारी, तुषार बंटी जगताप, सत्यजित अण्णा जगताप ,अक्षय मारणे (अखिल भारतीय मराठा महासंघ, शहराध्यक्ष) सागर जगताप, अनिल बापू माने (उद्योजक) आदी उपस्थित होते.
श्री सिद्धेश्वर देवस्थानच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार, रामेश्वर शिवलिंग मंदिराचे बांधकाम भविष्यातील पिढ्यांसाठी एक धार्मिक व सांस्कृतिक ठेवा ठरेल.
या प्रसंगी माजी आमदार चंदूकाका जगताप यांनी आपल्या भाषणात सुभाष अण्णा मारणे व त्यांच्या कुटुंबियांचे विशेष आभार मानून, अशा उपक्रमामुळे सासवडचा धार्मिक व ऐतिहासिक वैभव अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त केला.






