ताज्या घडामोडीपुणे

पुरंदर तालुक्यातील सासवड व ग्रामीण भागात लाईटचा लपंडाव, वारंवार विद्युत खंडित होण्याचे प्रकार वाढले


सासवड प्रतिनिधी सह्याद्री माझा – बापू मुळीक

तालुक्यातील सासवड या ठिकाणची लाईट वारंवार खंडित होत आहे सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक

सासवड( ता.पुरंदर) येथील सासवड शहरातील गेल्या तीन ते चार आठवड्यापासून वीज पुरवठा हा सतत खंडित केला जात आहे. सध्या तरी पंधरा दिवसापासून ही समस्या अधिक गंभीर बनलेली आहे. कोणतीही पूर्व सूचना न देता,

ठोस कारण नसताना सुद्धा दिवसाढवळ्या, रात्री अपरात्री अचानक वीज पुरवठा खंडित सतत होत आहे. त्यामुळे नागरिक विद्युत मंडळाच्या संदर्भात पूर्णपणे वैतागलेले आहेत. महावितरण याबाबत नागरिकांना किंवा प्रसार माध्यमांना कोणतीही सूचना अधिकृत देत

नाहीत. अचानक विद्युत पुरवठा खंडित करण्याचा सर्वाधिक फटका हा व्यापारी, विद्यार्थी व सामान्य नागरिकांना विद्युत मंडळाचा फटका बसत आहे. शहरांमधील पूर्णपणे विजेवरच या अवलंबून असलेल्या लहान मोठ्या व्यावसायिकांना तर याचा जास्त प्रमाणात फटका बसत

आहे. शहरातील रुग्णालयामधील अनेक अत्यावश्यक सेवा, उपकरणे, विजेवर चालतात, वारंवार वीज पुरवठा खंडित झाल्याने, रुग्णांच्या उपचारात मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे वैद्यकीय सेवा पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता नाकारताही येत नाही.

या महावितरणच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र स्वरूपात नाराजी व्यक्त केली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता आणि समस्येची निवारण न करता, ठोस उपाय योजना न करता, वारंवार वीज पुरवठा हा खंडित केला जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये याबाबत संतापाची लाट उसळत आहे. उन्हाळा असल्याने सासवड

नगरपालिकेचे पाणी आल्यानंतर तर सतत लाईट जात असते, यावर विद्युत मंडळ व सासवड नगरपालिका यांच्यामध्ये कोरडी नेशन नाही, त्यामुळे त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे. एक तर दोन दिवसांनी पाणी येत असल्यामुळे, या गोष्टीमुळे सामान्य नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. कोट:वादळी वाऱ्यामुळे

खांबावरील तारा तुटणे, मुख्य वाहिनीवरील सतत बिघाड होत आहे, सध्या तरी काही ठिकाणी अडचणी व समस्या निर्माण झालेल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या साठी दुरुस्तीची कामे सध्या, सासवड शहरात चालू आहेत. रोहित डामसे, मुख्य अभियंता सासवड शहर.


Translate »
error: Content is protected !!