पुणे

सासवड – नारायणपूर रस्त्यावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::

सासवड-नारायणपूर रस्त्यावर भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू

खानवडी (ता. पुरंदर) –
सासवड-नारायणपूर रोडवरील भिवडी गावाजवळ हॉटेल रुद्राक्ष समोर मंगळवारी (दि. २२ जुलै) सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास भरधाव टँकरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात खानवडी येथील नंदू रत्नाकर होले (वय २२) व अपूर्वा रविंद्र कुंभारकर (वय २३, रा. कुंभारवळण) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, नंदू व अपूर्वा हे होंडा अ‍ॅक्टिवा (क्रमांक MH12-XV-9442) वरून नारायणपूरकडे जात होते. दरम्यान, समोरून भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे येणाऱ्या टँकर (क्रमांक MH12-RN-6843) ने त्यांना हॉटेल रुद्राक्ष समोरील रस्त्यावर जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की, दोघांना गंभीर जखमी अवस्थेत सासवड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर दोघेही उपचारापूर्वीच मृत झाल्याचे घोषित केले.

या प्रकरणी नंदू होले याचे मोठे भाऊ सुधीर रत्नाकर होले यांनी सासवड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार, टँकर चालक हरिभा भिवा टोणे (वय ४६, रा. लोणीकाळभोर, ता. हवेली) याने निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून आणल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पोलीसांनी घटनेची नोंद घेतली असून, पुढील तपास सासवड पोलीस करत आहेत.


Translate »
error: Content is protected !!