शरद नागरी सहकारी पतसंस्थेच्या व्हाईस चेअरमन पदी दत्तात्रय टिळेकर यांची बिनविरोध निवड
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
शरद नागरी सहकारी पतसंस्थेच्या उपाध्यक्षपदी दत्तात्रय टिळेकर यांची बिनविरोध निवड
सासवड : सासवड शरद नागरी सहकारी पतसंस्था मर्यादितच्या उपाध्यक्षपदी सासवडचे दत्तात्रय हरिभाऊ टिळेकर यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या सासवड येथील सभागृहात ही निवडणूक पार पडली.
श्री. टिळेकर हे सन 1993 पासून विद्युत मंडळ पारेषण कंपनीचे वाहतूक कंत्राटदार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वीचे उपाध्यक्ष रूपचंद बाबुराव कांडगे यांनी कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. या पदासाठी एकमेव अर्ज दाखल झाल्याने श्री. टिळेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
या वेळी संस्थेचे चेअरमन एम. के. गायकवाड, माजी मुख्याध्यापक बाळासाहेब मुळीक, रूपचंद कांडगे, लक्ष्मण फडतरे, सौ. अलका फडतरे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. टिळेकर यांच्या निवडीबद्दल संस्थेचे संस्थापक विजयदादा कोलते, प्रतिभा महिला पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. शशिकला कोलते, गुरोळी गावचे माजी सरपंच व अंजीर–सिताफळ संघाचे उपाध्यक्ष रामचंद्र खेडेकर यांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.






