पावसाच्या काळात नागरिकांनी नियम राखणे गरजेचे बिकट परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या वायरमेनच्या सेवेला आदर द्या
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा::
पावसाच्या काळात नागरिकांनी संयम राखणे गरजेचे बिकट परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या वायरमेनच्या सेवेला द्या आदर सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक
अवकाळी वादळी पावसामुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे, जोरदार वाऱ्यामुळे विजेच्या तारा तुटणे, खाब कोसळणे, ट्रान्सफॉर्मर बिघडणे यामुळे अनेक ठिकाणी तासंनतास अंधार पसरतो, अशी बिकट परिस्थितीमध्ये वायरमन जीव धोक्यात घालून, वीज पुरवठा पुरवत करण्यासाठी, झटत असतात त्यांच्या या कार्याकडे दुर्लक्ष न करता, त्याला आधार
देणे हे महत्त्वाचे असून, त्या संदर्भात वीज ग्राहकांचे हे कर्तव्य आहे, वादळाने तारा तुटणे, शॉर्टसर्किट होने, खांब वाकणे अशा घटनांमुळे वीज पुरवठा खंडित होत आहे. पावसात आणि विजेच्या धोकादायक परिस्थितीत वायरमन खांबावर चढून तारा जोडाव्या लागतात, तर कधी ट्रान्सफॉर्मर मध्ये बिघाड असल्यास, तेथेही काम करावे लागते,
हे काम अत्यंत दक्षतेने आणि सावधगिरीने करावे लागते, वीज पुरवठा खंडित झालेला पाहून, अनेक नागरिक त्वरित वायरमन ला फोन करून तक्रारी करत असतात, हे फोन कधी कधी वायरमन खांबावर काम करता असताना फोन येतात, ज्यामुळे त्यांची लक्ष विचलित होण्याची शक्यता असते, फोन उचलताना अपघात होऊ
शकतो, अशाप्रसंगी संयम बाळगणे फायदेशीर ठरू शकते, रात्री वीज गेल्यास उकाडयामुळे झोप लागली नसल्याच्या नागरिक तक्रारी पूर्णपणे करत आहेत, मात्र त्याचवेळी हेच वायरमन आपल्या झोपेची तमा न बाळगता, इतरांच्या झोपेसाठी कार्यरत असतात, त्यामुळे नागरिकांनी संयम बाळगून, वायरमन कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामात
सहकार्य करणे ही सामूहिक जबाबदारी असल्याचे मान्य केले पाहिजे.
पाऊस थांबताच आम्ही तत्काळ घटनास्थळी पोहोचतो, खांबावर चढून वायर हाताळणे हे काम जीवावर बेतणारे असते, अशावेळी नागरिकाकडून सतत फोन येतात, आम्ही फोन उचलू शकलो नाही ,तर काही ची नाराजी होते, पण फोन उचलण्याच्या घाईत अपघात होऊ शकतो, नागरिकांनी कृपया संयम बाळगावा आणि आम्हाला सहकार्य करून, आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करत आहोत.






