कोणत्याही क्षेत्रातील यशात मुलींचा मोठा वाटा – विजय कोलते नंदिनी वायकर, प्राजक्ता वायकर, नुपूर गोडसे यांचा सत्कार सोहळा मोठा उत्साहात
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा हनुमंत वाबळे–
कोणत्याही क्षेत्रातील यशात मुलींचा मोठा वाटा : विजय कोलते.
कोणत्याही क्षेत्रातील यशात मुलींचा मोठा वाटा – विजय कोलते
नंदिनी वायकर, प्राजक्ता वायकर, नुपूर गोडसे यांचा सत्कार सोहळा मोठा उत्साहात
समाजातील कृषी, विज्ञान,तंत्रज्ञान यासारख्या अथवा कोणत्याही क्षेत्रातील यशात मुलींचा मोठा वाटा आहे, असे उद्गार रयतच्या व्यवस्थापन समितीचे माजी सदस्य विजय कोलते यांनी काढले.
पिसर्वे गावातील दोन व पिंपरी तालुका पुरंदर गावातील सुकन्येचा त्यांनी मिळविलेल्या याच्याबद्दल डॉ. शंकरराव कोलते विद्यालय व जूनियर कॉलेज तसेच ग्रामस्थ पिसर्वे यांच्या वतीने कोलते यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी झालेल्या प्रवेश
परीक्षेत मुलींच्यात तिसरी आल्याबद्दल कु. नंदिनी नंदकुमार वायकर व गावातून पहिली एल. एल. एम. ही कायद्याची परीक्षा पास झालेली कु.प्राजक्ता नामदेव वायकर हिचा सत्कार करण्यात आला.
मौजे पिंपरी येथील पिसर्वे विद्यालयाचे माजी विद्यार्थी सध्या पोलीस सबइन्स्पेक्टर असलेले विश्वास गोडसे यांची कन्या कु. नुपूर हिने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयइएस (IES) ही अभियांत्रिकी क्षेत्रातील जागा मिळविल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला.
मुलींनी कठोर मेहनत घेण्याचे ठरविले तर त्यांचे भविष्य उज्वल आहे, असा विश्वास कु. नंदिनी व कु. प्राजक्ता यांनी व्यक्त केला.याप्रसंगी सरपंच रवींद्र कोलते, उपसरपंच महेश वाघमारे,माजी सरपंच शांतारामबापू कोलते, संभाजी कोलते,
ग्रा.प. सदस्य बापू कोलते,सुनील कोलते, अरुण कोलते, विकास कोलते, नितीन वायकर, सुनीता कोलते, संतोष कोलते, गौरव कोलते, महादेव शेडकर, प्रकाश मारणे उपस्थित होते.प्रा. महेश कोलते यांनी प्रास्ताविक केले, साईनाथ कोलते यांनी आभार मानले.






