पुणे

शिवरी – खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर भुईमूग, बाजरी पिकातील उगवण क्षमता प्रक्रिया मार्गदर्शन वर्ग संपन्न


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे :
पुरंदर प्रतिनिधी –

दि. २० जून २०२६ – शिवरी येथील हनुमान मंदिर परिसरात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर भुईमूग, बाजरी पिकातील बियाणे उगवण क्षमता, बीजप्रक्रिया मार्गदर्शन वर्ग घेण्यात आला. त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना बीबीएफ पद्धतीनुसार पेरणीचे महत्त्व पटवून देण्यात आले.

तसेच महाडीबीटीवरील कृषि यांत्रिकीकरण घटकामधून बीबीएफ यंत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन केले. त्याचबरोबर पीएमएफएमइ, महिला बचत गटांसाठी लघुउद्योग प्रोत्साहनासाठीच्या योजनांविषयी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
त्यावेळी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, पुरंदर आणि मंडळ कृषि अधिकारी कार्यालय, परिंचे मार्फत मार्गदर्शक म्हणून श्री. संदीप कदम (उप कृषि अधिकारी), श्री. अतुल हिंगणे (सहाय्यक कृषि अधिकारी) उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन श्री. धिरज अहिवळे (सहाय्यक कृषि अधिकारी), श्री. दीपक मस्के (सहाय्यक कृषि अधिकारी) यांनी केले.


Translate »
error: Content is protected !!