पिसर्वे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदी सौ ललिता सदाशिव कोलते यांची बिनविरोध निवड
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
पिसर्वे विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी सौ. ललिता सदाशिव कोलते यांची बिनविरोध निवड
पुरंदर तालुक्यातील मौजे पिसर्वे (ता. पुरंदर, जि. पुणे) येथील 113 वर्षे जुनी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी पहिल्यांदाच महिला म्हणून सौ. ललिता सदाशिवआप्पा कोलते यांची बिनविरोध निवड झाली. ही निवड पुरंदर सहाय्यक निबंधक कार्यालयात एकमताने पार पडली.
महिलेला प्रथमच संधी मिळाल्यामुळे पिसर्वे सोसायटी तसेच परिसरात आनंद व्यक्त करण्यात आला. निवडीनंतर सासवड येथे सौ. कोलते यांचा सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी माजी आमदार अशोकभाऊ टेकवडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस विजयदादा कोलते, शिवसेना तालुकाध्यक्ष हरिभाऊ लोळे, रमेश इंगळे, वसंतराव शेवाळे, संभाजी महाराज ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी शिवले, आप्पासाहेब कोलते, उद्योजक सिद्धेश शिवले, अण्णासाहेब शेवाळे, पिसर्वे गावचे सरपंच रवींद्रआबा कोलते, माजी सरपंच शांतारामबापू कोलते, बाळासाहेब कोलते, संभाजीदादा कोलते, उपसरपंच चंद्रकांत कोलते, पिसर्वे सोसायटीचे सर्व सभासद, ग्रामपंचायत सदस्य तसेच महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण कोलते यांनी केले तर आभार प्रदर्शन चेअरमन सौ. ललिता सदाशिव कोलते यांनी मानले.






