जवळार्जुन येथे रब्बी पूर्व पीक नियोजन अभियानांतर्गत शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे:
उपसंपादक नवनाथ राणे::
जवळार्जुन येथे रब्बी पूर्व पीक नियोजन अभियानांतर्गत शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम
ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचालित कृषी विज्ञान केंद्र बारामती तसेच कृषी विभाग, महाराष्ट्र शासन – आत्मा पुणे व तालुका कृषी विभाग पुरंदर यांच्या संयुक्त विद्यमाने जवळार्जुन येथे रब्बी पूर्व पीक नियोजन अभियानाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला मा. राजेंद्रदादा पवार, चेअरमन, ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. विवेक भोईटे, विषय विशेषज्ञ, केवीके बारामती व डॉ. मिलिंद जोशी, शास्त्रज्ञ, केवीके बारामती यांनी शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन, रोग आणि कीड व्यवस्थापन, तसेच योग्य खत व औषध वापराविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
पुरंदर तालुक्यातील एकूण आठ ठिकाणी हे मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून जवळार्जुन येथेही शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमास सरपंच, माजी सरपंच, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक तसेच मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व भगिनी उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांनी आपले विविध प्रश्न जेजुरीचे कृषी मंडळ अधिकारी श्री. धायगुडे यांच्या समोर मांडले. अधिकारी व तज्ज्ञांनी शेतकऱ्यांच्या शंका निरसन करून आधुनिक शेतीविषयक उपाययोजना सांगितल्या.






