अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात जवळार्जुन मध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात चालू
पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा नवनाथ राणे
अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची सुरुवात जवळार्जुन मध्ये मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात
हरिनाम सप्ताह जवळार्जुन मध्ये मोठ्या भक्तीमय वातावरणामध्ये 30 जानेवारी 2025 रोजी झाली सलग 45 वर्षे हा अखंड हरिनाम सप्ताह होत असताना याही वर्षी पांडुरंग महापूजा होऊन कलश पूजन
व ग्रंथ पूजन पार पडले, यावेळी माजी आमदार अशोक भाऊ
टेकवडे, माजी सरपंच अण्णासाहेब राणे, माजी सरपंच माऊली नाना राणे, नवनिर्वाचित सरपंच अजिंक्य टेकवडे, तंटामुक्तीचे अध्यक्ष
शिवाजी राणे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख सतीश साळुंखे, वि का सो चेअरमन महेश राणे, गणेश राणे, महाराष्ट्र पोलीस प्रमोद राणे, पत्रकार नवनाथ राणे याच बरोबर समस्त ग्रामस्थ जवळार्जुन वारकरी टाळकरी
भजनी मंडळ यांच्या हस्ते पूजन होऊन या अखंड हरिनाम सप्ताह चे मार्गदर्शनाखाली , व्यासपीठ मोहन महाराज पवार मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह होणार असून नियोजन
जालिंदर टेकवडे करीत आहेत दररोज गाथा पारायण वाचन, प्रवचन , किर्तन व महाप्रसादाचे आयोजन समस्त ग्रामस्थ जवळार्जुन ,ग्रामपंचायत जवळार्जुन, विविध कार्यकारी सोसायटी यांच्या माध्यमातून होणार असल्याचे संयोजकांनी सांगितले






