पुणे

मोरगाव मयुरेश्वर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सिटीस्कॅन सेवेला सुरुवात


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::
उपसंपादक नवनाथ राणे::

मोरगाव मयुरेश्वर हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सिटीस्कॅन सेवेला सुरुवात

📍 मोरगाव (ता. बारामती)
ग्रामीण भागातील रुग्णांच्या गरजा लक्षात घेऊन मयुरेश्वर हॉस्पिटल, मोरगाव येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर (दि. 2 ऑक्टोबर 2025, गुरुवार) अत्याधुनिक सिटीस्कॅन यंत्रणा सुरू करण्यात आली.

हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. चंद्रकांत हाके, डॉ. प्रमोद पवार आणि एम.डी. विशाल देवकाते यांच्या प्रयत्नांतून ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

यापूर्वी मोरगाव व परिसरातील रुग्णांना तपासणीसाठी बारामती किंवा पुण्याला जावे लागत होते. मात्र, आता अपघातग्रस्त रुग्णांसह इतर तातडीच्या तपासण्या स्थानिक स्तरावरच होत असल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचा वेळ आणि खर्च वाचणार आहे.

सिटीस्कॅन सेवेमुळे मोरगाव, नाझरे, जवळर्‍जुन, मावडी, पिंपरी मावडी, राजुरी, नायगाव, पिसर्वे, पांडेश्वर, आंबी, तरडोली, सुपे, पळशी, मासाळवाडी, जळगाव, लोणी, भापकर तसेच पंचक्रोशीतील रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रुग्ण व गावकऱ्यांनी समाधान व्यक्त करत सांगितले की,
“डॉ. हाके यांच्या उपचारामुळे आम्ही आधीच समाधानी आहोत. आता सिटीस्कॅन सुविधा उपलब्ध झाल्यामुळे लोकांना अधिक वेगाने आणि योग्य उपचार मिळणार आहेत.”


Translate »
error: Content is protected !!