पुणे

ग्रामपंचायत जवळार्जुन येथे माहिती अधिकार दिन उस्ताहात संपन्न


मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे;
संपादक नवनाथ राणे ,,:’

ग्रामपंचायत जवळार्जुन येथे माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा

पुरंदर तालुका │ माहिती अधिकार दिन हा दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. काही कारणास्तव या वर्षी हा कार्यक्रम १० ऑक्टोबर २०२५ रोजी ग्रामपंचायत कार्यालय जवळार्जुन येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमास सरपंच सोमनाथ कणसे, ग्रामसेवक लोणकर मॅडम, इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक निगडे सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक जगताप सर, राणे वस्ती शाळेचे शिक्षक गायकवाड सर, उपसरपंच शिवाजी राणे, तसेच विविध संस्थांचे संचालक सुनील टेकवडे, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र जगताप, महिलावर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते पत्रकार नवनाथ राणे यांनी माहिती अधिकार कायद्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की,

> “लोकशाही बळकट होण्यासाठी नागरिकांना शासनाच्या कामकाजाची माहिती मिळणे अत्यावश्यक आहे. माहिती अधिकार कायदा हा सामान्य नागरिकाचे शक्तिशाली अस्त्र आहे, त्यामुळे प्रत्येकाने या कायद्याचा योग्य वापर करावा.”
कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि माहिती अधिकाराबाबत जनजागृती वाढवण्याची गरज व्यक्त केली.


Translate »
error: Content is protected !!