ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विर -श्रीनाथ म्हस्कोबा देवाची यात्रा 10 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी यात्रा होणार 23 फेब्रुवारीला मारामारी पारंपारिक रंगशिपन


पुरंदर प्रतिनिधी सह्याद्री माझा-
महाराष्ट्रात प्रसिद्ध असणारी श्रीक्षेत्र वीरची यंदाची यात्रा दि. १०/०२/२०२५ ते २८/०२/२०२५ या कालावधीत पार

पडत असून दि. ११/०२/२०२५ रोजी देवाचा लग्न सोहळा होऊन यात्रेची सुरुवात होते तर यात्रेचा मुख्य दिवस मारामारी पारंपारिक रंगशिंपण दि. २३/०२/२०२५ रोजी होत आहे.

याकामी आज यात्रानियोजनबाबत सर्व प्रशासकीय यंत्रणाची बैठक पुरंदर चे आमदार, मा. ना. विजयबापू शिवतारे (मा-मंत्री) यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनाथ म्हस्कोबा सांस्कृतिक भवन वीर येथे शासकीय बैठक पार पडली. यात्रेसाठी आवश्यक सर्व

प्रशासकीय विभाग त्यांच्या विभागीय भूमिका याबाबत विजयबापू शिवतारे यांचेमार्फत आदेशित करण्यात आले.
यावेळी उपविभागीय अधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रमसिंग रजपूत, पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी सोबत सर्व प्रशासकीय विभागांचे प्रमुख तसेच श्रीनाथ देवस्थान वीरचे मुख्य विश्वस्त इतर सर्व विश्वस्त, सल्लागार, पदाधिकारी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच सदस्य ग्रामस्थ, कोडीत गावचे उपसरपंच व सहकारी यावेळी उपस्थित होते.
यात्रा काळात कोणतेही अनुचित प्रकार होऊ नये तसेच भाविकांना दर्शनासाठी येत असताना गैरसोय होऊ नये. यासाठी देवस्थान ट्रस्ट व ग्रामस्थांना सर्व मदत करावी असे निर्देश सर्व प्रशासनास करण्यात आले. अशी माहिती विश्वस्त सुनिल धुमाळ यांनी दिली.


Translate »
error: Content is protected !!