मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या वतीने श्री संत सोपान काका पालखीच्या वारकऱ्यांना 20 हजार रेनकोट वाटप
सह्याद्री माझा प्रतिनिधी;;
महाराष्ट्रचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वतीने संत सोपान काका चे पालखी ला 20,000 रेन कोट वाटप
सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक वारीमध्ये चालत असताना वारकरी तहान भूक विसरून, विठ्ठलाचे दर्शनासाठी अहोरात्र चालत असतात, मात्र त्यांचे पावसा पासून रक्षण करता यावे, यासाठी आळंदी येथे माऊली ची पालखी तसेच देहू मध्ये संत तुकाराम महाराज यांची पालखीत वारकरी भाविक, भक्त यांना रेन कोट वाटप करण्यात आले होते.
मात्र माऊली चे धाकटे बंधू सोपानकाका यांचे पालखीस या समयी रेन कोट वाटप करण्यात आले. याचा शुभारंभ पुरंदर चे प्रांत वर्षा लांडगे यांचे शुभ हस्ते करण्यात आला. यावेली पुरंदर तहसीलदार विक्रम राजपूत , भा.ज.यु.मोर्चा चे प्रदेश सचिव श्रीकांत ताम्हाणे, बाळासो भोसले, मयूर जगताप, श्रीकांत थिटे, चैतन्य मांडके, दत्ता धेंडे, महेश राऊत, दिपक जावळे, आदी मान्यवर वारकरी उपस्थित होते.






