पुणेशैक्षणिक

यादववाडी येथील अशोक बाणे यांना राज्यस्तरीय शिक्षकेतर शैक्षणिक सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित


संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे::

यादववाडी येथील अशोक बाणे यांना राज्यस्तरीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार

सासवड प्रतिनिधी: बापू मुळीक पुणे येथील शिव समर्थ प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार माध्यमिक विद्यालय यादववाडी (ता. पुरंदर) या विद्यालयतील पुणे जिल्हा शिक्षकेतर संघ उपाध्यक्ष अशोक बाणे यांना देण्यात आला.

शिव समर्थ प्रतिष्ठान हे प्रतिवर्षी शैक्षणिक क्षेत्रातील शाळा, संस्था मुख्याध्यापक, शिक्षक शिक्षकेतर बंधू भगिनींचा शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. अशोक बाणे हे लिपिक या पदावर गेली 28 वर्ष कार्यरत असून, त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेत, हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे.

सदर शैक्षणिक सेवा गौरव पुरस्कार जेष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते व प्राचार्य गुलाब सिंह कदम, मा. शिक्षणाधिकारी अनिल गुंजाळ, शिक्षकेतर महामंडळाचे अध्यक्ष अनिल माने सहकार्यवाह शिवाजी खांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला आहे.

अध्यक्षीय भाषणात श्रीपाल सबनीस यांनी आपल्या मराठी शाळा टिकणे, खूप गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.सात जिल्ह्यातून 25 पुरस्कार प्राप्त झालेल्यांची कौतुक केले. शिवसमर्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी खांडेकर यांनी आपल्या भाषणात सात जिल्ह्यातून हे 25 पुरस्कार देण्यात आले असून, याचे काम चांगले आदर्श व विद्यार्थी शाळा गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न,

या कार्याची दखल घेऊन, पुरस्कार देण्यात आलेले असे नमूद केले.हरगुडे ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष डॉ.एम.जी.ताकवले सचिव जाफर शेख खजिनदार अविनाश ताकवले सहसचिव उल्हासराव ताकवले व सर्व संस्था पदाधिकारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.उपस्थितांमध्ये दिलीप नेवसे, वसंत ताकवले, राजेंद्र शिरसाट, सिद्राम कांबळे, पांडुरंग जाधव, कीर्तीकुमार मेमाणे, संदीप चाचर, राम भोसले आदी उपस्थित होते.


Translate »
error: Content is protected !!