जवळार्जुन येथील श्री काळभैरवनाथ व माता जोगेश्वरी ट्रस्टच्या विरोधात ग्रामस्थांचे आमरण उपोषण सुरू
उपसंपादक सह्याद्री माझा नवनाथ राणे::
जवळार्जुन येथे बेकायदेशीर ट्रस्ट स्थापनेच्या विरोधात आमरण उपोषण
जवळार्जुन (प्रतिनिधी) :
जवळार्जुन येथील श्री काळभैरवनाथ माता जोगेश्वरी ट्रस्ट ग्रामस्थांच्या विश्वासात न घेता स्थापन केल्याच्या आरोपावरून ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन सुरू केले असून, या प्रकरणाच्या निषेधार्थ ग्रामस्थ सोमनाथ नारायण राणे (मा. तंटामुक्ती अध्यक्ष) यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरवाडी येथे झालेल्या लाईव्ह युट्युब ग्रामसभेच्या प्रक्षेपणानंतर ग्रामसभेच्या विषयपत्रिकेत हा विषय नसतानाही ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून ठराव मंजूर केला. त्या ठरावाच्या आधारे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे ट्रस्ट मंजुरीसाठी अर्ज दाखल करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
गावामध्येकाळभैरवनाथ व जोगेश्वरी माता ट्रस्टचा ठराव बेकायदेशीर पद्धतीने ट्रस्ट स्थापन करण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या पार्श्वभूमीवर रविवार, दिनांक ८ मार्च २०२६ रोजी जवळार्जुन येथे ग्रामसेवकांच्या बैठकीत समस्त ग्रामस्थांना या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर या निर्णयाच्या विरोधात सोमनाथ नारायण राणे यांनी आमरण उपोषण सुरू केले असून, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
या उपोषणाला गावातील प्रमुख ग्रामस्थांचा पाठिंबा मिळाला असून यावेळी ॲड. महेश राणे, जनार्दन टेकवडे, ॲड. सतीश राणे, सतीश साळुंखे, शिवाजी राणे ,भीमराव राणे, नागेश टेकवडे, गणेश राणे, बापूराव राणे, देवस्थानाचे पुजारी रमेश दळवी, आकाश दळवी यांच्यासह इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
ग्रामस्थांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून बेकायदेशीर ट्रस्ट रद्द करावा, अशी मागणी केली आहे.






