सासवड येवलेवाडी कोंढवा रोड उद्या आठ एप्रिल रोजी सकाळी साडेसात नंतर हिंदू आक्रोश मोर्चाच्या कारणाने आवश्यकतेनुसार राहणार बंद
मुख्य संपादक सह्याद्री माझा हनुमंत वाबळे ::
सासवड–येवलेवाडी मार्गावर वाहतूक निर्बंध सकाळी साडेसात वाजले पासून आवश्यकतेनुसार बंद
पुणे, दि. 08 एप्रिल 2026
सासवड ते येवलेवाडी दरम्यान सकल हिंदू समाज यांच्या वतीने “हिंदू जन आक्रोश मोर्चा” आयोजित करण्यात आल्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता आहे. यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपदेव घाट मार्गाने सासवडकडे जाणारा रस्ता सकाळी ७ वाजल्यापासून आवश्यकतेनुसार तात्पुरता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
दरम्यान, पर्यायी मार्ग म्हणून खडीमशीन चौक – उंड्री चौक – मंतरवाडी फाटा – दिवे घाट – सासवड हा मार्ग खुला ठेवण्यात आला आहे.
वाहतूक शाखेकडून वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे तसेच शक्यतो गर्दीच्या वेळेत प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर






