ब्रेकिंग न्यूज

रिपाइं श्रमिक ब्रिगेड चे शिवतीर्थावर सोमवारी होणार आंदोलन,- विष्णू दादा भोसले


सोमवारी १२ ऑगस्ट रोजी रिपाइंचे सासवड येथील शिवतीर्थावर जाहीर निदर्शने आंदोलन,

सासवड : प्रज्ञासुर्य डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा काढून टाकणार्या अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम नवीन जागेत तात्काळ सुरु करण्यात यावे या मागणीसाठी सोमवार दि. १२ / ८ / २०२४ रोजी सकाळी ठिक ११ – ०० वाजता सासवड नगरपालिके

समोरील शिवतीर्थावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांच्या वतीने जाहीर निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे.
१४ जून २०२४ रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा काढून टाकण्या बाबतचे कोणतेही

शासनाचे आदेश नसताना , व पुरंदर तालुक्यासह हाडपसर ते पंढरपूर पालखी मार्गाचे काम गेले अनेक वर्ष अपुर्ण असताना, व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नवीन जागेत पुनर्वसन केल्याशिवाय मुळ पुतळ्यास हात लावू नये अशी आंबेडकरी जनतेची

मागणी असताना, अधिकाराचा गैरवापर करून , कर्तव्यात कसूर करुन, कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही, धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत, कायदा पायदळी तुडवत , एखादा दगड उचलून टाकावा,अशा प्रकारे राजकीय पक्ष लोकप्रतिनिधी पत्रकार, आंबेडकरी

जनता सामाजिक संघटना, भिमानुयायी यांच्याशी चर्चा न करता, भारतीय संविधानाचे निर्माते ज्यांच्या संविधानावर देशाचा कारभार चालतो अशा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, संगनमताने

कटकारस्थान करुन पुरंदर तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी तथा प्रांत वर्षा लांडगे, पुरंदरचे तहसिलदार विक्रम राजपूत भोर उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे, जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त

इंगोले, जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक वाघचौरे व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता यांनी जातीय द्वेषातून महामानवाच्या पुतळ्याची विटंबना होणार नाही, यांची दक्षता न घेता चोरासारखा डॉ बाबासाहेब आंबेडकर

यांचा पुतळा काढून टाकला आहे, या जातीवादी प्रवृत्तीच्या अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडच्या वतीने, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे उपमुख्यमंत्री

अजित पवार रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील , राज्याचे मुख्य सचिव, राज्याचे पोलीस महासंचालक, विभागीय आयुक्त पुणे विभाग, जिल्हाधिकारी पुणे जिल्हा, ग्रामीण पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण व पोलीस निरीक्षक सासवड

पोलीस स्टेशन यांना निवेदन देऊन, संबंधित मनूवादी अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे नवीन जागेत तात्काळ काम सुरु करण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हे आंदोलन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या मार्गदर्शनाखाली, रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते माजी आमदार अँड एल टी सावंत, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ सतिश

केदारी , पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत कदम, रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीच्या वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्षा संगिताताई आठवले, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा संघमित्रा गायकवाड, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोषनाना डोळस, रिपब्लिकन श्रमिक

ब्रिगेड पारधी आघाडीचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष पुरुषोत्तम पवार, रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे पुणे शहर अध्यक्ष किशोर पंडागळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करणार असून, या आंदोलनास रिपब्लिकन पक्षाचे व श्रमिक ब्रिगेडचे तालुका जिल्हा शहर राज्य व विभागीय

समितीचे सर्व मान्यवर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत, तसेच या आंदोलनास, काॅंग्रेस पक्षाच्या अनुसूचित जाती सेलचे जिल्हाध्यक्ष व सासवड नगरपालिका बांधकाम समितीचे माजी सभापती सोपानराव रणपिसे, राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार)

गटाचे सामाजिक न्याय विभागाचे पुरंदर तालुक्याचे अध्यक्ष व जेजुरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अविनाश भालेराव, आदीवासी कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष दत्तात्रय दरेकर, कोडीत खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच विशाल कांबळे, बहुजन युथ पॅंथरचे तालुका अध्यक्ष कालीदास उबाळे, बहुजन सामाजिक विकास प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नामदेव नेटके, यांच्यासह विविध संघटनेने या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला असून ते

देखील या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणार आहेत, या आंदोलनाचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णूदादा भोसले रिपब्लिकन पक्षाचे जेष्ठ नेते, पंढरीनाथ जाधव हे करणार असून, आंदोलनाचे नियोजन , रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश संघटक सचिव गोविंद जगताप,

रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष, भिवा वळकुंदे , सरचिटणीस प्रकाश कदम, कार्याध्यक्ष अशोकराव गायकवाड रिपब्लिकन पक्षाचे नेते बळीराम सोनवणे, युवानेते विजय घोडेस्वार, स्वप्नील पाटोळे यांनी केले आहे, हे आंदोलन कोणत्याही पक्षाच्या विरोधात नसून , श्रेय वादासाठी नसून चूकीच्या प्रवृत्तीच्या

विरोधात आहे, त्यामुळे सर्व राजकीय पक्षाच्या वतीने सामाजिक संघटनेच्या वतीने गावोगावी असलेल्या मंडळाच्या वतीने, या आंदोलनात सहभागी होऊन या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यात यावा असे आव्हान रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश संघटक सचिव गोविंद जगताप यांनी केले आहे .


Translate »
error: Content is protected !!