सासवड- हडपसर रोड वरील झेंडेवाडी येथील अपघातातील मयताची ओळख पटवण्याचे आवाहन
सासवड प्रतिनिधी हनुमंत वाबळे ::
सासवड-हडपसर रोडवरील अपघातातील मयताची ओळख पटविण्याचे आवाहन
सासवड-हडपसर रोडवरील हॉटेल राधाकृष्ण समोरील पुलावर लाल रंगाच्या एक्स्ट्रीम मोटारसायकलवरील अज्ञात चालकाचा दुधाच्या टँकरला पाठीमागून धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात मोटारसायकल चालकाचा मृत्यू झाला आहे.
मयताची अद्याप ओळख पटलेली नसून त्याच्या नातेवाईकांचा शोध सुरू आहे. नागरिकांनी मयताची ओळख पटविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मयताचे वर्णन :
– वय अंदाजे : 26 ते 28 वर्षे
– रंग : गोरा
– उंची : 5 फूट 5 इंच
– केस : काळे व लांब
– दाढी : वाढलेली
ओळख पटविणारी वैशिष्ट्ये :
– उजव्या हाताच्या पोटरीवर “SANTOSH” असे गोंदलेले
– डाव्या हाताच्या दंडावर त्रिशूल गोंदलेले
डाव्या हाताच्या पंजावर “S” असे गोंदलेले, या हाताच्या पोटरीवर santhosh लिहिलेलं आहे
– पोटावर व छातीवर जुन्या जखमेचे व्रण
अंगावरील कपडे :
– काळ्या व पिवळ्या रंगाच्या लाईनिंगचा शर्ट
– निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट
सदर व्यक्तीची ओळख कोणाला पटत असल्यास किंवा त्यांच्या नातेवाईकांबाबत माहिती असल्यास संबंधित पोलीस ठाण्याशी तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.ही बातमी सोशल मीडिया व व्हॉट्सअॅप ग्रुपवर प्रसारित केल्यास मयताची ओळख पटण्यास मदत होऊ शकते.
पोलीस उपनिरीक्षक श्रीराम पालवे
9970612511
पोलीस हवालदार भिवराज शिंदे
9552825273






